Covid 
सोलापूर

शहराबाहेरील कोरोनाचा आता शहरात प्रवेश; मुख्याधिकाऱ्याविना सुरू आहे "या' पालिकेचा लढा 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : शहराबाहेर असणारा कोरोना अखेर शहरात येऊन धडकला. त्यामुळे शहरातील नागरिकांची खळबळ उडाली. मात्र पालिकेची उपाययोजना करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मुख्याधिकाऱ्याविना लढा सुरू आहे. 

काल प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये शहरातील एक रुग्ण पूर्ण पॉझिटिव्ह असल्याचे सांगितल्यामुळे प्रशासनाने रात्रीपासून यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्यास सुरवात केली. सध्या या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील नऊ जणांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून शहरातील दुकाने- व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने आज होणारे सौदे देखील बंद केले आहेत. पालिकेच्या वतीने या प्रभागामध्ये फवारणीची सुरवात करण्यात आली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून शहरामधील वातावरण शिथील केल्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शहरामध्ये याचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याची चर्चा सुरू असतानाच, अखेर शहरात पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. रिक्त पदे आणि अतिरिक्त कामकाज यामुळे पोलिसांवरील कामाचा ताण वाढत असताना, आता नव्याने त्यामुळे प्रतिबंधक उपाययोजनेची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांवर येऊन पडली आहे. आतापर्यंत महसूल, पोलिस, नगरपालिका प्रशासन यांनी समन्वयाने काम केल्यामुळे शहरातील वातावरण सुरळीत होते. मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची नुकतेच महाबळेश्वर येथे बदली झाली. त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती केली नसल्यामुळे सध्या नगरपालिकेच्या प्रशासनाचा गाडा कारभाऱ्याविना सुरू आहे. अशा परिस्थितीत सध्या शहरातील लोकप्रतिनिधी व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी समन्वयातून काम करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी नागरिकांना परावृत्त करणे आवश्‍यक असताना, शासनाने कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी शहरातील नागरिकांतून होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT