4Sakal_Vishesh 
सोलापूर

'कोरोना'ची धास्ती ! सोलापुरातील सिव्हिलसह 19 हॉस्पिटलची निवड 

तात्या लांडगे

सोलापूर : चीनमधील कोरोना हा विषाणूजन्य आजार आता पुण्यापर्यंत येवून ठेपला आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आरोग्य विभागाच्या तातडीच्या दोन बैठक घेतल्या असून सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना निगराणीसाठी ठेवण्याचे निश्‍चित झाले आहे. तर श्री शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाच बेडचा स्वतंत्र कक्ष उपचारासाठी तयार ठेवला आहे. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयासह पंढरपूर, अकलूज, बार्शीतील नामवंत हॉस्टिपलमधील बेडही राखीव ठेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 


कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण दोन टक्‍क्‍यांपर्यंतच आहे, जास्तीच्या तापमानात कोरोनाचा विषाणू टिकाव धरत नसल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी तथा गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे, गर्दी जमेल असे समारंभ करु नयेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. खोकला, सर्दीसह अन्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या व आजारी प्राण्यांच्या संपर्कात राहू नये, एक मिटर अंतरावरुन त्याच्याशी बोलावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जास्त तापमानात कोरोनाचा विषाणू जास्त प्रमाणात टिक नाही. मात्र, खोकला, सर्दी अशी लक्षणे असलेल्या रुग्णांच्या सहवासात नागरिकांनी राहू नये. सण-समारंभ साजरे करताना नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, कोरोनाचा उगम हा प्राण्यांपासून झाल्याने मांस खाताना पूर्णपणे शिजवलेले मांस खावावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 


तो चालक माळशिरसमधील गुरसाळेचा... 
मुंबई ते पुणे येथे दुबईवरून आलेल्या प्रवाशांना कोरोना हा विषाणू निश्‍चित झाला आहे. त्यांना मुंबईवरून आणणाऱ्या गाडी चालकासही कोरोना विषाणू झाल्याचे निश्‍चित झाले आहे. या गाडीचा चालक गुरसाळे (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने दहा वर्षापूर्वी गुरसाळे सोडल्यापासून 3 गाड्या विकत घेतल्या असून या कार कंपनीस करारावर दिल्या आहेत. कोरोना झाल्याचे निश्‍चित झाल्यामुळे शासनाने त्याच्या कुटुंबियांनाही निगराणीखाली हॉस्पिटल मध्ये ठेवले आहे. 


19 खासगी रुग्णालयांना दिले पत्र 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जावू नये, सार्वजनिक समारंभ साजरे करताना खबरदारी घ्यायला हवी. दरम्यान, कोरोनाचे महाराष्ट्रात रुग्ण आढळल्याने सोलापुरातील अकलूज, पंढरपूर, बार्शी येथील नामवंत 19 खासगी रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिले असून त्याठिकाणी राखीव बेडची व्यवस्था केली जाणार आहे. सोलापुर शहरातील खासगी सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी पाच बेडची व्यवस्था केली आहे. तसेच वाडिया हॉस्पिटलमध्ये बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना निगराणीखाली ठेवले जाणार आहे. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातही उपचाराची सोय करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

Karad Chain Snatching: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ‘जॅक’ पडला भारी; कऱ्हाडमध्ये उसातून शोधला सोनसाखळी चोर, श्वानाने काढला माग

SCROLL FOR NEXT