Santnath Maharaj 
सोलापूर

वैरागच्या श्री संतनाथ महाराज यात्रेवर कोरोनाचे महासंकट, हजारो वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच यात्रा रद्द ! 

कुलभूषण विभूते

वैराग (सोलापूर) : यंदा वैरागच्या श्री संतनाथ महाराज यात्रेवर कोरोनाचे महासंकट आले आहे. बार्शी तालुक्‍यातील वैराग शहरात वाढती कोरोनाची संख्या पाहता श्रावणातील मोठ्या प्रमाणात भरवण्यात येणारा यात्रा महोत्सव इतिहासात पहिल्यांदाच रद्द करण्यात आला आहे. 

नारळी पौर्णिमा हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. अभिषेक, नैवेद्य, पहाटे नाथांचा जोग, महाप्रसाद, भव्य पालखी मिरवणूक, दहीहंडी महोत्सव व शोभेचे दारूकाम हे यात्रेचे मुख्य आकर्षण असते. यात्रेस हजारो वर्षांची परंपरा असून, यात्रेच्या इतिहासात प्रथमच यात्रा रद्द करण्याची वेळ वैरागकरांवर आली आहे. मात्र यात्रेची धार्मिक परंपरा कायम राहण्यासाठी ठराविक मानाच्या मुख्य मानकऱ्यांसमवेत मंदिरात धार्मिक उत्सव होणार आहेत. यात्रा काळात संचारबंदी असणार असून, कोणालाही "श्रीं'चे दर्शन घेता येणार नाही. यावर्षी कोरोनामुळे ग्रामस्थांनी आपापल्या घरी राहून पूजा व यात्रा महोत्सव साजरा करावा, असे आवाहन मंदिर समितीने व वैराग पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. 

मुंबई गॅझेटमध्ये नोंद असलेली व श्रावण महिन्यात होणारी सोलापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठी यात्रा म्हणून या यात्रेची ओळख आहे. नारळी पौर्णिमा हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. प्रतिवर्षी भरणारी यात्रा यंदा कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. बार्शी तालुक्‍यात सर्वांत जास्त कोरोना बाधितांची संख्या वैराग शहरात आहे. त्यामुळे यंदा संतनाथ यात्रा महोत्सवाबाबत वैराग पोलिस ठाण्यात मंगळवारी संध्याकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी यात्रेत होणारे सांस्कृतिक, मनोरंजन व सार्वजनिक कार्यक्रम होणार नाहीत. शिवाय गावात कोरोनाचा रेड झोन असल्याने यात्रा रद्द करण्याबरोबरच भंडारा, करमणूक कार्यक्रम, शोभेचे दारूकाम, कुस्ती, कसरत कार्यक्रम, सार्वजनिक दहीहंडी, पालखी महोत्सव असे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय झाला. तर परंपरा म्हणून फक्त धार्मिक कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे बैठकीत सर्वानुमते ठरले. 

या वेळी संतनाथ महाराज ट्रस्टीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, पंच मृणाल भूमकर, पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड, मानकरी घोंगडे, प्रताप निंबाळकर, निरंजन भूमकर, मकरंद निंबाळकर, अरुण बंडेवार, श्रीशैल्य पाटील आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT