सोलापूर

Solapur Custodial Death: पोलीस कोठडीत संशयित आरोपी मृत्यू प्रकरण, ७ पोलिसांचा अटकपूर्व जामीन मंजूर

विजापूर नाका पोलिस ठाण्यातील कोठडीत संशयित आरोपीच्या मृत्यूप्रकरणी पोलिस निरीक्षकासह सात पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने ५० हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.

सकाळ डिजिटल टीम

Solapur Crime News: विजापूर नाका पोलिस ठाण्यातील कोठडीत संशयित आरोपीच्या मृत्यूप्रकरणी पोलिस निरीक्षकासह सात पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने ५० हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.

पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, पोलिस हवालदार श्रीरंग खांडेकर, पोलिस नाईक शिवानंद पिंपळे, पोलिस नाईक लक्ष्मण राठोड, पोलिस नाईक अंबादास गड्डम, पोलिस शिपाई आतिश पाटील अशी अटकपूर्व जामीन मिळालेल्या संशयितांची नावे आहेत. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या कोठडीत संशयित भीमा राजा काळे (वय ४१) याचा मृत्यू झाला होता.

संशयितांच्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी संशयितांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहिता १७६ नुसार न्यायालयीन चौकशी झाली आहे. या चौकशीत संशयित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संशयित भीमा काळे यास कोणत्याही प्रकारची मारहाण केली नाही. त्याचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचे म्हटल्याचे न्यायाधीश भारती डांगरे यांनी नमूद केले आहे.

ॲट्रॉसिटी लागू होत नाही, न्यायालयाचे निरीक्षण

उच्च न्यायालयाने हा गुन्हा भारतीय दंड संहिता कलम ३०४ नुसार गुन्हा होत नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. तसेच याप्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम (ॲट्रॉसिटी) लागू होत नसल्याचे निरीक्षण नोंदवलेले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT