Covid Center Esakal
सोलापूर

रुग्णसंख्या घटल्याने कोव्हिड केअर सेंटर्स बंद !

रुग्णसंख्या घटल्याने शहरातील कोव्हिड केअर सेंटर्स बंद

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील रुग्णसंख्या वाढल्यानंतर महापालिकेच्या वतीने चार कोव्हिड केअर सेंटर्स (Covid Care Centers) तर रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींसाठी पाच क्‍वारंटाईन सेंटर्स (Quarantine Centers) सुरू करण्यात आले. मात्र, आता शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याने सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाशिवाय अन्य कोव्हिड केअर सेंटर्स बंद केले आहेत. तर विजयपूर रोडवरील म्हाडा क्‍वारंटाईन सेंटर वगळता अन्य क्‍वारंटाईन सेंटर्सलाही कुलूप लावण्यात आले आहे. (Covid Care Centers closed in the city due to declining Covid patient numbers)

महापालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने कोरोना काळात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात कोव्हिड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली. सिंहगड कॉलेज, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, वाडिया हॉस्पिटल आणि पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे कोव्हिड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली. तर रुग्णांच्या थेट संपर्कातील संशयितांसाठी विजयपूर रोडवरील म्हाडा, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, ऑर्किड कॉलेज, डब्ल्यूआयटी कॉलेज व भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात क्‍वारंटाईन सेंटर तयार करण्यात आले. त्या ठिकाणी असलेल्या सर्वांना महापालिकेतर्फे मोफत जेवण व उपचार केले गेले. हा खर्च परवडत नसल्याने आणि रुग्णसंख्याही कमी झाल्याने सिंहगड वगळता सर्वच कोव्हिड केअर सेंटर्स व क्‍वारंटाईन सेंटर्स बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

शहरातील रुग्णालयांमध्ये 790 रुग्ण

शहरातील जवळपास 57 रुग्णालयांमध्ये कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना काळात महापालिकेच्या बॉईस व वाडिया या केवळ दोन रुग्णालयांमध्येच कोरोना रुग्णांवर उपचार सुरू झाले. आता वाडिया हॉस्पिटलमध्ये एकही रुग्ण नसून बॉईस व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) काही रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच बरेच रुग्ण खासगी रुग्णालयातही उपचार घेत आहेत. सद्य:स्थितीत शहरातील एकूण 790 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे रुग्णालयातील बहुतेक बेड रिकामे झाल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे.

शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याने आता सिंहगड कॉलेजमधील एकमेव कोव्हिड केअर सेंटरमध्येच रुग्ण आहेत. उर्वरित सेंटर्स तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. विजयपूर रोडवरील म्हाडा क्वारंटाईन सेंटरशिवाय अन्य सेंटरही बंद केले आहेत.

- संदीप कारंजे, नगर अभियंता, सोलापूर महापालिका

कोव्हिड केअर सेंटर्सची सद्य:स्थिती : सेंटर, रुग्णांची क्षमता, (सध्याचे रुग्ण)

  • सिहंगड कॉलेज : 600 (180)

  • शासकीय तंत्रनिकेतन : 150 (00)

  • वाडिया हॉस्पिटल : 125 (00)

  • पोलिस प्रशिक्षण केंद्र : 470 (00)

  • एकूण क्षमता : 1345 (180)

क्‍वारंटाईन सेंटर्सची सद्य:स्थिती : सेंटर, एकूण क्षमता, (सध्याचे संशयित)

  • म्हाडा : 450 (66)

  • विद्यापीठ : 850 (00)

  • "बीगसीई' कॉलेज : 190 (00)

  • ऑर्किड कॉलेज : 120 (00)

  • डब्ल्यूआयटी : 333 (00)

  • एकूण : 1343 (66)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''काहींना यात राजकारण करायचंय'', मराठा आरक्षणाच्या 'जीआर'वरुन मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांचे कान टोचले

Latest Marathi News Updates Live : प्रतिज्ञापत्रावरुन मराठ्यांना ओबीसीत टाकता येणार नाही - छगन भुजबळ

Explained: लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास कोणती लक्षणे दिसतात अन् कोणते उपाय करावे? वाचा आयुर्वेद तज्ज्ञांचे मत

Nagpur News: नागपूरमधील यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने संपवले जीवन; मानसिक ताणाच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त

Income Tax Law: आता २० हजारांपेक्षा जास्त रोख रकमेचा व्यवहार महागात पडणार, आयकर विभागाचा नवीन नियम तुम्ही वाचलात का?

SCROLL FOR NEXT