Covid Hospital Esakal
सोलापूर

सरसावली "निमा' ! माळशिरस तालुक्‍यात आठ ठिकाणी कोव्हिड हॉस्पिटल

निमा संघटनेतर्फे माळशिरस तालुक्‍यात आठ ठिकाणी कोव्हिड हॉस्पिटल

गहिनीनाथ वाघंबरे

माळशिरस (सोलापूर) : तालुक्‍यातील डॉक्‍टरांची "निमा' (NIMA) संघटना कोरोनावर (Covid-19) विजय मिळवण्यासाठी पुढे सरसावली आहे. कोव्हिडच्या पहिल्या लाटेवेळी तालुक्‍यातील सर्व पॅथीच्या डॉक्‍टरांनी एकत्र येऊन राज्यातील पहिले कोव्हिड हॉस्पिटल (Covid Hospital) सुरू केले होते, अशी माहिती माळशिरस तालुका संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉ. प्रवीण पाटील यांनी दिली. दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी बेड शिल्लक नाहीत. अशा स्थितीत निमाच्या डॉक्‍टरांनी तालुक्‍यातील प्रत्येक मोठ्या गावात कोव्हिड हॉस्पिटल्स सुरू केली आहेत. तसेच याच हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्‍सिजन बेड (Oxygen Bed) उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

शहरनिहाय कोव्हिड हॉस्पिटलल्सची नावे, उपलब्ध असणाऱ्या बेडची संख्या व त्या ठिकाणी रुग्णांची सेवा करणारे निमा संघटनेचे डॉक्‍टरर्स याप्रमाणे :

  • श्रीपूर : श्रेयश कोव्हिड हॉस्पिटल : डॉ. सुधीर पोफळे, डॉ. उत्तम खरात, डॉ. प्रमोद पवार, डॉ. आनंद पोखरे, डॉ. सचिन पाटील, डॉ. विनोद शिंदे - एकूण 25 बेड्‌स.

  • श्रीपूर : निदान कोव्हिड हॉस्पिटल : डॉ. हरिश्‍चंद्र सावंत पाटील, डॉ. जितेंद्र गायकवाड, डॉ. विजय डहाळे, डॉ. जावेद मुल्ला - एकूण 20 बेड.

  • माळीनगर : माळीनगर कोव्हिड हॉस्पिटल : डॉ. अस्लम शेख, डॉ. प्रकाश कदम, डॉ. विजयकुमार कोकरे, डॉ. संजय घोंगाणे जाधव, डॉ. संभाजी हाके, डॉ. सुरेंद्र मिसाळ, डॉ. फारुक शेख - एकूण 10 बेड.

  • अकलूज : कदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल : डॉ. तानाजी कदम - 25 बेड.

  • वेळापूर : माने देशमुख कोव्हिड हॉस्पिटल : डॉ. जयंत चव्हाण, डॉ. उदय माने देशमुख, डॉ. रोहित माने देशमुख, डॉ. अमर माने देशमुख, डॉ. सोमनाथ माने देशमुख, डॉ. पांडुरंग देवकाते, डॉ. अमोल कोळेकर, डॉ. उमेश नाईक - एकूण 25 बेड.

  • नातेपुते : नातेपुते मल्टी स्पेशालिटी कोव्हिड हॉस्पिटल : डॉ. आप्पासाहेब वाघमोडे, डॉ. स्मिता वाघमोडे, डॉ. रूपेश माने, डॉ. प्रियांका दोशी - एकूण बेड 15.

  • माळशिरस : धन्वंतरी कोव्हिड हॉस्पिटल : डॉ. अनिल पाटील, डॉ. नितीन सिद, डॉ. पंकज नलवडे, डॉ. नितीन वाघमोडे, डॉ. सचिन देशमुख - एकूण 30 बेड.

  • माळशिरस : माळशिरस कोव्हिड हॉस्पिटल : डॉ. दत्तात्रय सर्जे, डॉ. दिलीप वाघमोडे, डॉ. मच्छिंद्र गोरड, डॉ. सचिन केमकर - एकूण 10 बेड.

"निमा' ही डॉक्‍टरांची देशव्यापी संघटना असून आपत्तीच्या वेळी नेहमीच शासनाला व जनतेला सहकार्य व सेवा देत असते. गेल्या वर्षापासून निमाच्या डॉक्‍टरांनी फिव्हर क्‍लिनिक, कोव्हिड केअर सेंटर व कोव्हिड हॉस्पिटलच्या माध्यमातून तालुक्‍यातील जनतेची सेवा केली आहे. या सर्व हॉस्पिटल्समध्ये आवश्‍यक यंत्रसामग्री उपलब्ध आहे. कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेची शक्‍यता असल्याने बालकांसाठी कोव्हिड हॉस्पिटल सुरू करण्याचा मानस आहे. शासनाने हॉस्पिटल मंजुरीच्या व रिपोर्टिंगच्या अटी शिथिल कराव्यात. ऑक्‍सिजन व रेमडेसिव्हिरचा पुरवठा सुरळीत करावा.

- डॉ. प्रवीण पाटील, अध्यक्ष, निमा संघटना, माळशिरस तालुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT