sanskrut.jpg 
सोलापूर

संस्कृत करिअरमध्ये अध्यापन, संशोधनासोबत नॉलेज प्रोडक्‍टची निर्मिती 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः संस्कृत भाषा केवळ प्राचीन व धार्मिक गोष्टीशी जोडली नसून त्यामध्ये उत्तम करिअरच्या संधी निर्माण होत आहेत. अध्यापन, संशोधनासोबत त्यातील माहितीच्या आधारे विशेष उत्पादनांची निर्मिती संस्कृतचे विद्यार्थी करत आहेत. 

संस्कृत भाषा ही केवळ धार्मिक विषयाशी जोडलेली आहे हा गैरसमज करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी खोटा ठरवला आहे. संस्कृत भाषेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्यापनाच्या संधी फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. बहुतांश शाळांमधून संस्कृत हा भाषा विषय जोडण्यात आला आहे. तसेच हा भाषा विषय स्कोरिंग साठी उपयुक्त असल्यामुळे विद्यार्थी या भाषेची निवड करतात. मात्र नंतर संस्कृतमध्ये पुढील शिक्षण घेत नाहीत. ज्या विद्यार्थ्यांनी संस्कृतचे शिक्षण घेतले आहे त्यांना सातत्याने अध्यापन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी मिळत आहे. कारण बहुतांश ठिकाणी शाळामध्ये संस्कृत शिक्षकांची मोठी कमतरता आहे. संस्कृतमध्ये पदवी व बीएड डीएड सारखी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी संस्कृत शिक्षण पूर्ण केले त्यांना शिक्षक पदासाठी मोठी मागणी आहे. 
संस्कृत ग्रंथांचे वाचन करून त्यावर संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक संशोधन संस्था मदत करीत असतात. पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूट मधून संशोधनासाठी अनेक प्रकल्प चालवले जातात. 
संस्कृत साहित्यामधील विज्ञान तत्त्वे समजून घेत त्यावर आधारित संशोधन देखील आता होऊ लागले आहे. संस्कृत मधील ज्ञानाच्या आधारे विशेष प्रकारची नॉलेज प्रोडक्‍ट घेण्याचा प्रयोग होऊ लागला आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे या निर्मितीला अधिक चालना मिळणार आहे. सोलापूरमध्ये संस्कृत साहित्यातील माहितीच्या आधारे विशेष प्रकारच्या मास्क आणि दिनचर्या किटची निर्मिती केली गेली. विद्यार्थ्यांना त्यांचे वाचनाचे स्मरण वाढावे यासाठी संस्कृत साहित्यात संशोधन करून विशेष प्रकारच्या अभ्यासक्रमाची निर्मिती केली गेली. त्याचा लाभ विद्यार्थ्यांसह स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांकडून मोठ्या प्रमाणात केला जात आहे. 

ठळक बाबी 
- अध्यापकांच्या जागासाठी शिक्षकांची मोठी मागणी 
- अनेक संशोधन प्रकल्पात संस्कृत अभ्यासकांना संधी 
- संस्कृत साहित्याच्या अभ्यासातून नॉलेज प्रोडक्‍टची निर्मिती 
- संस्कृतसोबत विदेशी भाषेचे शिक्षण घेतल्यास मोठ्या संधी 
- मशीन लॅंग्वेजसाठी संस्कृतचा उपयोग 
- आयएएस साठी संस्कृत विषय घेता येतो 
- प्रत्येक राज्यातील संस्कृत विद्यापीठात संधी 

पदव्यूत्तर शिक्षण महत्वाचे 
संस्कृत शिक्षणाची सोय सोलापूर मध्ये पदव्युत्तर पर्यंत झालेली आहे संस्कृतमध्ये डीएड आणि बीएड हे अभ्यासक्रम उपलब्ध करणे आवश्‍यक आहे 
- प्रा. रेवा कुलकर्णी, विभाग प्रमुख, संस्कृत विभाग दयानंद महाविद्यालय, सोलापूर 


थेट जॉब मिळण्याचा अनुभव 
संस्कृत शिक्षणानंतर मला थेट पुणे येथे संस्कृत शिक्षिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. संस्कृत शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने मला थेट संधी मिळाली. 
- गंधाली गिरीश सहस्रबुद्धे, माजी विद्यार्थी, दयानंद महाविद्यालय, सोलापूर  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT