crime against 6 in case of child marriage mohol rural hospital police doctor esakal
सोलापूर

Solapur Child Marriage : बालविवाहाप्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा; मोहोळ ग्रामीण रुग्णालयात प्रकार उघडकीस

पोलिस-डॉक्टरांची सतर्कता; गुन्हा दाखल मात्र अद्याप कोणाला अटक नाही

सकाळ वृत्तसेवा

Mohol News: डॉक्टरांच्या व पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह लावून दिलेल्या भटजीसह सहा जणांविरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

पीडित बालिका ही १ डिसेंबर रोजी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात धनुर्वातीचे (टी.टी). इंजेक्शन घेण्यासाठी सासू व पतीसोबत आली होती. डॉक्टरांना तिच्या वयाबाबत संशय आल्याने त्यांनी तिच्या आधार कार्डवरील जन्मतारीख पाहिली, त्यावेळी ती अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.

तर ती गर्भवतीही असल्याचे समजले. दरम्यान, डॉक्टरांनी ही घटना मोहोळ पोलिसांना कळविली. मोहोळ पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक अंजना फाळके यांनी त्या बालिकेकडे चौकशी केली असता,

ती अल्पवयीन असताना तिच्या नातेवाइकांनी तिचा विवाह लावून दिल्याचे तिने सांगितले. त्यानुसार ही घटना मोहोळ पोलिसांनी सोलापूर येथील महिला व बालकल्याण समिती यांना कळविली.

बालविकास प्रकल्प अधिकारी अमृत सरडे यांनी याबाबत मोहोळ पोलिसांत तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पीडित गर्भवती बालिकेच्या सासू- सासरे, आई- वडील, पती व विवाह लावून देणारा भटजी अशा सहा जणांविरोधात मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल मात्र अद्याप कोणाला अटक नाही

संबंधित सहा संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक गेले असता ते मिळून आले नाहीत. त्यामुळे अद्याप कोणाला अटक झाली नाही. ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक श्रीमती फाळके, पोलिस शिपाई खवतोडे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT