Solapur Crime 
सोलापूर

पार्किंगला लावलेली रिक्षा पळविली ! वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांची वहिनीला बेदम मारहाण 

तात्या लांडगे

सोलापूर : निराळे वस्ती येथे पार्किंगला लावलेली ऑटोरिक्षा चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद सचिन सुभाष जाधव यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. निराळे वस्ती या ठिकाणी भिंतीलगत एमएच 13 सीटी या क्रमांकाची रिक्षा लावली होती. काही तासांनी त्या ठिकाणी रिक्षा नव्हती. कोणीतरी संमतीविना रिक्षा पळवून नेल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. चव्हाण हे करीत आहेत. 

महिलेस जीवे मारण्याची धमकी 
महिलेस शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जाफर गुलाब शेख व शहाबाज गुलाब शेख (रा. नवीन विडी घरकुल, कुंभारी) याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. रुकसाना अ. गनी शेख (रा. गांजी मोहल्ला, बाबा कादरी मस्जिदजवळ) यांनी फिर्याद दिली. दरम्यान, पतीचे वडील मयत झाल्याने त्यांच्या सांगण्यावरून मयताचे सर्व साहित्य काढून ठेवले. काही वेळात फिर्यादीचे पती त्या ठिकाणी आले. त्या वेळी शहाबाज शेख व जाफर शेख यांनी तुझ्यामुळेच आमचा बाप मेला म्हणून शिवीगाळ करीत रुकसानाला लाकडांनी मारहाण केली. तसेच तुला खल्लास करतो, अशी दमदाटीही केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. चौगुले हे करीत आहेत. 

लिफाफा न मिळाल्याने ट्रॅव्हल्स चालकास मारहाण 
ट्रॅव्हल्स चालकासोबत पुण्यावरून सोलापूरला एक लिफाफा दिला होता. तो लिफाफा पोच न झाल्याने अविनाश सदाशिव गंजे (रा. जुळे सोलापूर) याने ट्रॅव्हल्सचालक अर्जुन दशरथ शिंदे (रा. शिवाजीनगर, उळे, सोलापूर) यांना मारहाण केली. याप्रकरणी गंजेविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पुणे येथून प्रवासी घेऊन सोलापूरकडे येताना शिंदे यांचे नातेवाईक अतुल साळुंखे यांनी त्यांच्याकडे बंद लिफाफा दिला. तो लिफाफा भाऊ अमोल साळुंखे यांच्याकडे देण्यास सांगितले. मात्र, वाहन पाटस टोलजवळ थांबल्यानंतर तो लिफाफा गहाळ झाला. त्यानंतर शिंदे यांनी हा प्रकार आकांक्षा ट्रॅव्हल्सच्या मालकास सांगितला. त्यानंतर शिंदे यांना बोलावून जुना पूना नाका येथील समर्थ हॉटेलच्या पार्किंगमध्ये डांबून ठेवून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

जमाव जमविणाऱ्या पाचजणांविरुद्ध गुन्हा 
बेकायदा जमाव जमवून हातात लाकडी दांडकी व तलवारी बाळगल्याने अक्षय ऊर्फ अण्णा श्रीकांत जाधव (रा. धरमसी लाइन, एसटी स्टॅंडसमोर), आकाश ऊर्फ चोप्रा विलास चव्हाण (रा. दक्षिण कसबा, दत्त चौक), योगेश नागेश कोलते (रा. दक्षिण कसबा, दत्त चौक), निखिल भारत थोरवत (रा. विठ्ठल मंदिर, निराळे वस्ती) व शुभम श्रीकांत धुळराव (रा. बुधवार पेठ, महात्मा गांधी रोड) यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हवालदार संतोष मोरे यांना मध्यरात्री पेट्रोलिंग करताना शिवराव- भीमराव रिक्षा स्टॉपजवळ काही लोक सार्वजनिक रस्त्यावर जमावाने थांबल्याचे दिसले. संबंधितांकडे लाकडी काठ्या, तलवारी होत्या आणि ते भांडण करताना दिसले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT