Solapur Crime 
सोलापूर

मार्केट यार्डातील आडत व्यापाऱ्याची आत्महत्या; वाचा सोलापुरातील गुन्हे वृत्त 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर सिद्धेश्वर मार्केट यार्डातील भुसार आडत व्यापारी महादेव कल्लप्पा दहिटणे (वय 45, रा. धोत्री, ता. दक्षिण सोलापूर) यांनी मार्केट यार्डातील त्यांच्या दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. 

महादेव दहिटणे हे मार्केट यार्डातील व्यवसायासाठी नियमित धोत्रीहून सोलापुरात येत असत. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास दुकानातील छतास गळफास घेतलेला त्यांचा मृतदेह दिसून आला. त्यामुळे जमलेल्या लोकांनी तत्काळ जेलरोड पोलिसांना याबाबत माहिती दिली. दहिटणे यांनी आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली, याचा अद्यापपर्यंत उलगडा झालेला नसून, याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

एसटी बसमधून तरुणाची बॅग चोरीस 
चिंचवड - सोलापूर या शिवशाही एसटी बसमधील वरच्या कॅरिअरमधून चोरट्याने तरुणाच्या बॅगेसह त्यातील 22 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत अनुज अजित भोसले (वय 27, रा. खोपी बजरंग नगर, ता. खेड, जि. रत्नागिरी, सध्या म्युन्सिपल कॉलनी, रेल्वेलाइन, सात रस्ता) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 9 डिसेंबर रोजी रात्री दहा ते अकरादरम्यान अनुज भोसले हे चिंचवड-सोलापूर या शिवशाही बसमधून येत होते. त्या वेळी अज्ञात चोरट्याने त्यांची प्रवासी बॅग व त्यामधील इतर साहित्य चोरून नेले. पोलिस हवालदार शेख तपास करीत आहेत. 

कर्ज देण्याच्या बहाण्याने दीड लाखाची फसवणूक 
कर्जाची रक्कम देतो, असे सांगून बॅंक खात्यावर एक लाख 48 हजार रुपये भरण्यास लावून फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भरत नाना पाटील (वय 50, रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. 28 सप्टेंबर ते 26 ऑक्‍टोंबर 2020 या कालावधीत भरत नाना पाटील यांच्या मोबाईलवर अनुष्का देसाई, प्रवीण देशमुख आणि अजय या नावाच्या व्यक्तीने फोन करून त्यांना बजाज फायनान्सकडून बोलतो, असे सांगून सहा लाख रुपये शून्य टक्के व्याजाने कर्ज देतो, असे सांगितले. पाटील यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळोवेळी युनियन बॅंक, अलाहाबाद बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, ऍक्‍सिस बॅंक या बॅंकांच्या खात्यांमध्ये एक लाख 48 हजार रुपये भरण्यास लावून त्यांची फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक धायगुडे तपास करीत आहेत. 

दाटीवाटीने जनावरे नेणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल 
दाटीवाटीने जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनास पकडून जेलरोड पोलिसांनी 48 जनावरांची सुटका केली. याबाबत पोलिस शिपाई जमील मुलाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इलियास नजीर शेख (वय 30, रा. भीमाशंकर नगर, सोलापूर) आणि मोहसीन मकसूद कुरेशी (रा. भारतीय चौक, इकरार अली मशिदीच्या पाठीमागे, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 9 डिसेंबर रोजी पेंटर चौकातील इक्‍बाल मैदानाजवळ इलियास शेख व मोहसीन कुरेशी हे त्यांच्या ताब्यातील (क्र. एमएच 13 / एएन 5986) या क्रमांकाच्या जीपमध्ये म्हशीची व गायीची 48 वासरे ही जनावरे दाटीवाटीने भरून वाहतूक करीत असताना पकडली. पोलिस नाईक म्हेत्रे तपास करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT