Solapur Crime.
Solapur Crime. 
सोलापूर

शिक्षण संस्थेच्या वादातून सख्ख्या भावावरच केला जीवघेणा हल्ला ! वाचा सोलापुरातील गुन्हे वृत्त 

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्हा मतिमंद विद्यालयात अरुण सदाशिव धोत्रे हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शाळेच्या कामानिमित्त ते गुरुवारी (ता. 4) समाज कल्याण कार्यालयात गेले होते. त्या वेळी कार्यालयातील खुर्चीवर बसून ते कागदपत्रे पाहात असतानाच त्या ठिकाणी त्यांचे दोन भाऊ आले. त्यातील वसंत धोत्रे याने मागून पकडले आणि दुसऱ्या भावाने म्हणजेच आनंद धोत्रे याने तीक्ष्ण हत्याराने त्यांच्या डोक्‍यावर वार केल्याची घटना त्याच दिवशी घडली. या प्रकरणी सोमवारी (ता. 8) अरुण धोत्रे यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली असून, त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सख्ख्या भावांमध्ये मागील काही महिन्यांपासून संस्था आणि घरगुती कारणावरून वाद सुरू आहेत. याप्रकरणी धर्मादाय आयुक्‍त आणि समाज कल्याण कार्यालयाकडे तक्रारी दाखल आहेत. शाळेच्या कामानिमित्त अरुण धोत्रे हे गुरुवारी समाज कल्याण कार्यालयात गेले होते. त्या वेळी अचानकपणे त्यांचे दोन भाऊ त्या ठिकाणी आले. खुर्ची बाजूला सरकावून मोठ्याने ओरडू लागले. त्या वेळी आनंद धोत्रे म्हणाला, आता याला खल्लास करतो. तत्पूर्वी, वसंत धोत्रे याने अरुण यांना मागून पकडले. त्याच वेळी आनंद याने हातातील तीक्ष्ण हत्याराने अरुण यांच्या डोक्‍यावर वार केला. दरम्यान, ते थोडे बाजूला झाल्याने उजव्या डोळ्याजवळ जखम झाली. झटापटीत अरुण हे खाली पडले. त्या वेळी आनंद धोत्रे याने लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड हे करीत आहेत. 

भाजी खरेदी करताना मोबाईलची झाली चोरी 
हत्तुरे वस्ती भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करताना चोरट्याने शर्टाच्या खिशातील मोबाईल चोरून नेल्याची घटना रविवारी (ता. 7) सकाळी 11 वाजता घडली. या प्रकरणी राजेंद्र सातलिंगप्पा हौदे (रा. ओम नम: शिवाय नगर, होटगी रोड) यांनी आज विजापूर नाका पोलिसांत दिली. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. पटेल हे करीत आहेत. 

फ्लॅटच्या आमिषाने सव्वातीन लाखांची फसवणूक 
देगाव परिसरात पार्वती नगर या नावाने फ्लॅटची उभारणी करण्यात येणार असल्याची जाहिरात पाहून प्रमिला धनाजी भुसे (रा. आशीर्वाद नगर, मजरेवाडी) यांनी जागेची पाहणी केली. त्या वेळी युवराज दत्तात्रय बंकापुरे याने जागेचे कुलमुखत्यारपत्र लिहून दिले असून, तुम्ही बिनधास्तपणे रक्‍कम गुंतवा, असे सांगितले. त्याच्यावर विश्‍वास ठेवून भुसे यांनी टप्प्याटप्प्याने तीन लाख 21 हजार रुपयांची रक्‍कम त्या ठिकाणी गुंतवली. मात्र, जुलै 2010 पासून अद्याप जागा ताब्यात दिली नसून युवराज बंकापुरे, वैभव हिरेमठ, सिद्राम एकनाथ कराळे, किरण कराळे यांनी पैसेही परत केले नाहीत. जागा एनए नसतानाही आणि बांधकाम परवाना नसतानाही खोटी माहिती देऊन माझी फसवणूक केली आहे, अशी फिर्याद भुसे यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. मांजरे हे पुढील तपास करीत आहेत. 

वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू 
सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दूध पंढरीसमोर एका वाहनाने मंगळवारी (ता. 2) महिलेला धडक दिली. अपघातानंतर संबंधित वाहनचालक तिथून पसार झाला. या अपघातात त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांना महिलेची ओळख पटली नसून त्या महिलेचे अंदाजित वय 50 आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक मल्लिकार्जुन भालेकर यांनी फिर्याद दिली आहे. फौजदार चावडी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. मंद्रूपकर हे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: उद्धव ठाकरेंची विकेट आधीच पडलीए, ते क्लीनबोल्ड झालेत; CM शिंदेंना विश्वास

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT