Solapur Crime
Solapur Crime 
सोलापूर

अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म ! तरुणाला आठ वर्षांची सक्‍तमजुरी

तात्या लांडगे

सोलापूर : अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म आणि तिचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात अक्षय ऊर्फ साधू भास्कर रणशृंगारे (रा. पोफळी, ता. मोहोळ) यास न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी आठ वर्षांची सक्‍तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. 

नातेवाइकांच्या मदतीने अक्षयने मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेल्याची फिर्याद 10 जानेवारी 2018 रोजी मुलीच्या आईने मोहोळ पोलिसांत दिली होती. दरम्यान, घटनेचा तपास सुरू असतानाच 25 जानेवारी 2018 रोजी त्या दोघांना पोलिसांनी कोरेगाव येथून शोधून काढले. अक्षयने जबरदस्तीने रांजणगाव आणि कोरेगाव येथे नेऊन मुलीच्या मनाविरुद्ध अत्याचार केल्याचे पीडित मुलीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात 12 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पीडित मुलगी, तिची आई, डॉक्‍टर व तपासी अंमलदार यांची साक्ष त्यात महत्त्वाची ठरली. 

न्यायालयाने दुष्कर्म व विनयभंग या दोन्ही प्रकरणात आरोपीला अनुक्रमे सात आणि एक वर्षाची सक्‍तमजुरी तर प्रत्येक प्रकरणात पाच हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील शीतल डोके यांनी तर आरोपीतर्फे ऍड. बायस यांनी काम पाहिले. विनयभंग प्रकरणात तपासी अंमलदार पोलिस उपनिरीक्षक विक्रांत बोधे यांनी तर दुष्कर्म प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू गायकवाड यांनी तर कोर्ट पैरवी म्हणून पोलिस शिपाई श्री. धर्मे यांनी कामगिरी बजावली. 

दीपालीला मिळावा मरणोत्तर न्याय 
वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांना मरणोत्तर न्याय मिळावा, या मागणीसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध नोंदविला. दीपाली यांना न्याय मिळावा, त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणीही या वेळी करण्यात आली. याप्रसंगी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हाती फलक घेऊन निषेध नोंदविला. 

बॅंक खाते हॅक करून पाच लाखांची रक्‍कम ट्रान्स्फर 
स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेतून बोलतोय, म्हणून एका अनोळखी व्यक्तीचे मोबाईलवरून तात्या चंदू जाधव (रा. स्वामी विवेकानंद नगर, विजयपूर रोड) यांना 27 व 28 मार्च रोजी कॉल आले. बॅंक खात्याची माहिती जाणून घेण्याचा त्या व्यक्‍तीने प्रयत्न केला. कोणतीही माहिती दिलेली नसतानाही त्याने खाते क्रमांक व पासवर्ड हॅक करून स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या बाळीवेस येथील ट्रेझरी शाखेतील खात्यातून पाच लाखांची रक्‍कम परस्पर लांबविली. ती रक्‍कम चंदीगढ येथील स्टेट बॅंकेच्या शाखेतील खात्यात वर्ग केल्याची माहिती जाधव यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी सदर बझार पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदविली. पोलिस निरीक्षक अश्‍विनी भोसले या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT