Solapur Crime 
सोलापूर

सोलापुरातील गुन्हेगारी ! कंपनी जाळल्याप्रकरणी एसआरपीएफच्या पोलिसासह चौघांना सक्‍तमजुरी

तात्या लांडगे

सोलापूर : सन केमिकल्स ही कंपनी (शिंगडगाव, ता. दक्षिण सोलापूर) हाडांपासून पावडर तयार करते. 2 नोव्हेंबर 2016 मध्ये एका एसआरपीएफ पोलिस नाइकासह चौघांनी ती कंपनी जाळून टाकली. त्यानंतर 3 नाव्हेंबरला वळसंग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आणि पोलिस उपनिरीक्षक पी. आर. कांबळे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जे. मोहिते यांनी या प्रकरणातील चार आरोपींना पाच वर्षांची सक्‍तमजुरी आणि प्रत्येकी 28 हजारांचा दंड तर भा. दं. वि. कलम 384, 427 आणि 504 प्रमाणे प्रत्येकी सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली. 

मुरारजी पेठेतील दिगंबर ज्ञानोबा जाधव व कंपनी चालक शरीफ कुरेशी आणि कंपनीतील कामगार गेटवर थांबले होते. त्या वेळी चारजण दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. आता लगेच आम्हाला पाच हजार रुपये दे, तुमची कंपनी बेकायदेशीर असल्याचे त्यांनी कुरेशी यांना बजावले. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. सोबत आणलेल्या रॉकेलच्या बाटल्या हाडांच्या साठ्यावर ओतून आग लावली. त्यात वजन काटा मोडून तीन ते चार लाखांचे नुकसान केले आणि ते सर्वजण तिथून पसार झाले होते. 

या प्रकरणातील आरोपी मल्लय्या ऊर्फ सचिन बसय्या स्वामी हा सोरेगाव येथील एसआरपीएफमध्ये पोलिस नाईक होता. बचावासाठी त्याने कामगार हजर असल्याची बनावट कागदपत्रे दिली होती. या प्रकरणात आरोपींकडील दंडाची रक्‍कम कुरेशी यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणात आरोपी स्वामीतर्फे ऍड. राजकुमार म्हात्रे यांनी तर अन्य आरोपींतर्फे एस. आर. उंबरजे, ऍड. गायकवाड यांनी तर सरकारतर्फे ऍड. अहमद काझी यांनी काम पाहिले. 

प्लॉटवर कब्जा करण्याचा प्रयत्न; 15 जणांविरुद्ध गुन्हा 
घरासमोरील मालकीच्या जागेत येऊन मोठमोठ्याने आरडाओरड करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, दहशत पसरवून प्लॉटवर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातजणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. रेवणसिद्ध मल्लिकार्जुन कुंभार (रा. मल्लप्पा म्हेत्रे वस्ती, कुमठा नाका) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार नागेश शिवलिंगप्पा कोरे, प्रविणा नागेश कोरे (दोघेही रा. कल्लप्पा म्हेत्रे वस्ती, कुमठा नाका), सुमीत विजय मन्सावले, विजय ठाकूरसिंग मन्सावले, सुरेश जीवनसिंग गोरलेवाले, रणजितसिंग मोहनसिंग तारवाले आणि छत्तरसिंग गंगाराम हजारीवाले (सर्वजण रा. हुच्चेश्‍वर नगर, कुमठा नाका) यांच्यासह अन्य आठ अनोळखी व्यक्‍तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

मुलाला सायकल खेळवताना दुचाकीस्वारांनी पळविले मंगळसूत्र 
विजय देशमुख नगर परिसरातील गणपती मंदिरासमोरील सार्वजनिक रोडवर लहान मुलाला सायकल खेळवून पूजा मयूर स्वामी (रा. निर्मिती विहार, विजयपूर रोड) या मंदिराजवळ थांबल्या होत्या. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेल्याची फिर्याद पूजा स्वामी यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. अंदाजित 60 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र असल्याचे स्वामी यांनी पोलिसांना सांगितले. पोलिस उपनिरीक्षक श्री. बेंबडे हे त्या चोरट्यांचा शोध घेत असून ही घटना गुरुवारी (ता. 1) रात्री सव्वाआठच्या सुमारास घडल्याची नोंद पोलिसांत झाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police constable molests student on train Video : रेल्वेत झोपेचं सोंग घेवून शेजारी बसलेल्या विद्यार्थीनिचा विनयभंग करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलला अटक!

Pune News : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला ईपीएफओचा दणका; १२० कोटी ९० लाख रुपये पीएफ भरण्याचे आदेश!

Karad Crime : कराडमध्ये पोलिसांच्या ताब्यातील आरोपी बेड्यांसह पसार; पुणे-बंगळूर महामार्गावर खळबळ!

Aravalli Case: अरावली वाचवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय! नवीन खाण परवान्यांवर बंदी; उद्योगाला मोठा झटका

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीच्या १९० धावा; रोहित शर्माच्या १५५ अन् विराट कोहलीच्या १३१ धावा! बघा ३ शतकांचा ५ मिनिटांचा Video

SCROLL FOR NEXT