Crime News in Solapur
Crime News in Solapur  
सोलापूर

पत्नीचा खून करून पती कुऱ्हाडीसह गेला पोलिस ठाण्यात ! अनैतिक संबंधाच्या संशयातून घेणार होता घटस्फोट

तात्या लांडगे

सोलापूर : चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीचा खून केला आणि स्वत:हून पोलिसांत हजर राहिला. ही घटना डोणगाव (शंकरनगर) येथे 1 एप्रिलला घडली असून याप्रकरणी सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. विठाबाई सुरेश पुजारी यांनी पोलिसांत तशी फिर्याद दिली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

विजयपूर (कर्नाटक) येथील अमृताचा डोणगाव येथील गणेश बंडगर याच्याशी 20 फेब्रुवारीला विवाह झाला होता. विवाहानंतर आठ दिवसांनी त्या दोघांमध्ये वादावादी सुरु झाली. पत्नीचे बाहेरील व्यक्‍तींशी अनैतिक संबंध असल्याचा संशय गणेशला होता. दोघांमधील भांडण वाढू लागल्यानंतर त्या मुलीची आई विठाबाई या गणेशच्या घरी आल्या. त्यावेळी दोघांनी संमतीने घटस्फोट घेऊन विभक्‍त होण्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाली. परंतु, मुलीकडील लोकांनी आम्हाला आताच बॉण्डवर लेखी द्यावी, अशी मागणी गणेशने केली. काही दिवसांनी मुलीची आई, मावशी व अन्य दोघेजण गणेशच्या घरी आले आणि मुलीला घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी रागातून गणेशने त्यांना घराबाहेर काढून घर आतून लावून घेतले. घरातील कुऱ्हाडीने गणेशने पत्नीच्या डोक्‍यावर व हातावर वार केले. त्यानंतर तो स्वत: कुऱ्हाडीसह सलगर वस्ती पोलिसांत हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली आणि सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपत पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. तत्पूर्वी, तिच्या आईने जखमी मुलीला हॉस्पिटलला नेले होते. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. गणेशला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली असून पोलिस उपनिरीक्षक श्री. खंडागळे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

बीबी दारफळ रोडवरील मृत्यू अपघातीच

सोलापूर : बीबी दारफळहून (ता. उत्तर सोलापूर) कोंडीकडे येणाऱ्या रस्त्यावर एका 41 वर्षीय व्यक्‍तीचा दुचाकी घसरून मृत्यू झाल्याची नोंद तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे. अंबादास शंकर दाते असे त्या मृत व्यक्‍तीचे नाव असून ते बहिणीला भेटायला बीबी दारफळ येथे गेले होते आणि येताना अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

भारतरत्न इंदिरा नगरातील दाते यांचा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बीबी दारफळकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघात झाला. दारूच्या नशेत त्यांची दुचाकी रस्त्यालगतच्या खड्ड्यात घसरून पडली. या अपघातात त्यांच्या डोक्‍याला गंभीर जखम झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. तत्पूर्वी, दाते यांचा अपघाती मृत्यू आहे की, त्यामागे घातपात आहे, याची चाचपणी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी केली. दाते यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरही मृत्यू कसा झाला ही माहिती समोर येईल, असेही तालुका पोलिस ठाण्याकडून सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT