barshi gardi.jpg 
सोलापूर

बार्शीच्या बाजारातील गर्दी व दुकानदारांच्या बेशिस्तीने कोरोना संसर्गाला निमंत्रण 

सकाळ वृत्तसेवा

बार्शी(सोलापूर): बार्शी शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासन एकामागून एक शहरातील भाग प्रतिबंधित करत आहे. भाजी मंडई बंद असल्याने अनेक चौकात भाजी विक्रेत्यांनी ठिय्या मारून विक्री सुरू केली आहे. ना मास्क, ना सोशल डिस्टन्स यामुळे बार्शीकरांनी कोरोनाचा धोका गांभीर्याने घेतला नसल्याची परिस्थिती आहे. 

भवानी पेठ येथे पोस्ट चौक ते बस स्टॅंड रोड तसेच देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता असून हा भाग रहिवासी भाग आहे. येथे पहाटे 3 ते सकाळी 7 या वेळात नियमांचे उल्लंघन होत आहे. प्रशासनाने घातलेल्या नियमांची पायमल्ली करून मोठ्या प्रमाणात भाजी विक्री होत आहे. नगरपालिका प्रशासनाने भाजी मंडई बंद केल्यानंतर शहरात हातगाडीद्वारे विक्रीस परवानगी दिलेली आहे. पण कोणीही याकडे लक्ष देत नाही. सायंकाळी पाचपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी असताना अनेक दुकाने रात्री दहापर्यंत सुरू असतात. नगरपालिका प्रशासनाचे पथक ग्राहकांवर, व्यापाऱ्यांवर मास्क, सॅनिटायझरचा वापर केला नाही, सोशल डिस्टन्सिंग ठेवले नसला तरी कारवाई करत नसल्याचे चित्र आहे. 
बाजार समितीमध्ये लिलाव बंद असल्याने भाजीच्या लिलावाला सुमारे 200 ते 300 लोक असतात. येथे मोठ्या प्रमाणावर गोंधळ सुरू असतो. यामुळे भवानी पेठ भागातील रहिवाशांना मानसिक त्रास होत आहे अशी तक्रार येथील नागरिकांची आहे. 

बार्शी शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, जिल्ह्यात अनेक तालुक्‍यांत जनता कर्फ्यु पुकारण्यात येत आहे. त्याप्रमाणे बार्शी शहरातही तीन किंवा पाच दिवस पूर्ण शहर बंद ठेवून जनता कर्फ्यू लागू करण्याची मागणी होत आहे. यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होणार आहे. 

तर कारवाईच करावी लागेल 
केंद्र आणि राज्य शासनाचे अनलॉकचे धोरण आहे. बार्शी शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाहता ज्येष्ठ नागरिक व दहा वर्षांखालील मुले यांनी घराबाहेर पडूच नये. व्यापारी, नागरिक यांनी स्वतःची काळजी घेणे जरुरीचे आहे. प्रशासनाला कारवाईची वेळ येऊ देऊ नये. 
ऍड. असिफ तांबोळी, नगराध्यक्ष, बार्शी 

आधी भाजीपाल्याचा लिलाव बंद करा 
भवानी पेठ भाग भाजीच्या लिलावासाठी नसून, रहिवासी भाग आहे. लिलावातून राहिलेला भाजीपाला हा गटारामध्ये टाकला जातो. त्यामुळे प्रचंड घाण आणि दुर्गंधीचा त्रास होत आहे. प्रशासनाने यावर कडक कारवाई करून या भागातील लिलाव बंद करून त्यांची पर्यायी व्यवस्था करावी. 
- गिरीश कदम, रहिवासी, भवानी पेठ, बार्शी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT