Akkalkot Bajar 
सोलापूर

अक्कलकोटमध्ये उसळली गर्दी; "या' गावांमध्येही लॉकडाउन करण्याबाबत प्रांताधिकाऱ्यांनी दिला जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल

राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : शहरात गुरुवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून लॉकडाउन सुरू होणार आहे. दहा दिवस प्रशासनाकडून कठोरपणे लॉकडाउन केला जाणार असून, अत्यावश्‍यक सेवेमध्ये दूध, मेडिकल व खते, बी-बियाणे, रुग्णालये वगळता भाजीपाल्यासह सर्व व्यवहार बंद असणार आहेत, अशी माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली. 

दरम्यान, तालुक्‍यातील किणी, कुरनूर, मैंदर्गीसह ज्या गावांमध्ये बाधितांची संख्या जास्त आहे, त्या गावांमध्येसुद्धा लॉकडाउन लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल दिला असून, जर या गावांत लॉकडाउन जाहीर झाला नाही तर संपूर्ण गावांना प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून सर्व व्यवहार बंद ठेवले जातील, अशी माहिती प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली. 

अक्कलकोट शहरात 6 जुलै ते 13 जुलै असा जनता कर्फ्यू पाळण्यात आला. आता तीन दिवसांनी लगेचच दहा दिवसांचा प्रशासनाचा लॉकडाउन सुरू होणार असल्याने व्यापारी व नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. दहा दिवस कडक लॉकडाउन असल्याने बुधवारी ग्रामीण भागासह अक्कलकोट शहरातील नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. मुख्य बाजारपेठेसह बॅंका, खरेदी- विक्री कार्यालयांसह सर्वच दुकानांत ग्राहकांची गर्दी झाली होती. ग्रामीण भागातील काही लहान-मोठे व्यापारीही खरेदीसाठी आले होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT