Damaji Sugars 
सोलापूर

"दामाजी'चे अध्यक्ष समाधान आवताडे म्हणाले, संपूर्ण उसाचे गाळप करूनच होतोय "दामाजी'चा सांगता समारंभ !

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : दामाजी कारखाना शेतकऱ्यांचा असल्याने संपूर्ण उसाचे गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करावयाचा नाही, हा शब्द प्रमाण मानून 28 व्या गळीत हंगामात संपूर्ण उसाचे गाळप करूनच सांगता समारंभ साजरा करत आहोत, असे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी सांगितले. गाळप सांगता समारंभाप्रसंगी ते बोलत होते. 

अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी होते. यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आबासाहेब फडतरे, संचालक लक्ष्मण जगताप, राजीव बाबर, रामकृष्ण चव्हाण, शिवयोग्याप्पा पुजारी, भुजंगराव आसबे, बाळासाहेब शिंदे, बसवेश्वर पाटील, मारुती थोरबोले, सुरेश भाकरे, विजय माने, भारत निकम, प्रमोदकुमार म्हमाणे, चंद्रकांत पडवळे, नगरसेवक अनिल बोदाडे, दीपक माने, राजू पाटील, महेंद्र देवकते, शिवाजी मोहिते, भारत आतकरे, अशोक भिंगे, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सभासद व शेतकरी उपस्थित होते. 

अध्यक्ष आवताडे पुढे म्हणाले, निसर्गाच्या अनियमिततेमुळे जिल्ह्यात एकही कारखाना ठरविलेल्या उद्दिष्टापर्यंत जाऊ शकला नाही. ऊसदर, व्यापारी देणे व कामगारांचा पगार कसा द्यावयाचा अशा अनेक अडचणी प्रत्येक कारखानदारांवर आलेल्या आहेत. दामाजी कारखान्यावरील सभासदांचा, शेतकऱ्यांचा विश्वास अबाधित ठेवण्याचे काम आमच्या संचालक मंडळाने केले. कामगारांचे राहिलेले वेतन लवकरात लवकर करणार आहोत. ज्याप्रमाणे कारखान्यात ऊस तोडणी, वाहतूक ठेकेदार व बैलगाडीवान यांच्या पाठीवर थाप मारून गौरव होतो, त्याचप्रमाणे कारखान्यातील प्रत्येक विभागातील कामगाराच्याही पाठीवर थाप मारून गौरव करण्यात येईल. 

कार्यकारी संचालक झुंजार आसबे म्हणाले, 123 दिवसांत तीन लाख 71 हजार 497 मे. टन उसाचे गाळप करताना गाळप क्षमता 2500 मे. टन प्रतिदिन असताना सुद्धा सरासरी 3020 मे. टन प्रतिदिन गाळप केलेले आहे. त्यामध्ये बगॅस 26 हजार मे. टन, मोलॅसिस 15 हजार 826 मे. टन आणि प्रेसमड 10 हजार टन इतके उत्पादन झाले. परंतु संचालक मंडळाने आर्थिक अडचणीत अत्यंत काटेकोरपणे व्यवस्थापन केल्याने व त्यास कामगारांनी सहकार्य केल्याने गाळप हंगाम चांगल्या प्रकारे पार पडला. या वर्षीच्या 4.5 लाख मे. टन गाळप अपेक्षित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

Scam Alert Kolhapur : गोलमाल है भाई गोलमाल है! एक गाव आणि चार भक्त निवास, आणखी दोन भक्त निवासासाठी ४० लाखांची मंजुरी

पुण्यातील ऐतिहासिक पर्वती टेकडीचे सौंदर्य धोक्यात? TDR वाटपाचा वाद पुन्हा पेटला; चतुःशृंगी-शनिवारवाड्याला वेगळा न्याय का?

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये डेंग्यूचा कहर, ४०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद

iPhone 17 आजपासून भारतात उपलब्ध, खरेदीसाठी स्टोअरबाहेर झुंबड; मध्यरात्रीपासून रांगेत, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT