Kishor Phatale 
सोलापूर

लॉकडाउन : मुलीच्या इलाजासाठी करतोय फिरून चहाची विक्री 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने देश लॉकडाउन झाला आहे. यामुळे बड्या उद्योगांसह छोटे उद्योगही बंद असल्याने अनेक कामगार बेरोजगार झाले आहेत. घराबाहेर पडता येत नसल्याने अनेकजण कौटुुंबिक परिस्थिती बिकट असतानाही काहीच करता येत नसल्याने हताश झाले आहेत. मात्र एका भेळ गाडीवरील कामगार घरच्या अर्थार्जनासाठी, स्वत:च्या मुलीच्या इलाजासाठी व अत्यावश्‍यक सेवेतील लोकांसाठी चहा पोचवण्याची सेवा बजावत आहे. 

कर्तव्यावरील पोलिसांना मोफत चहा 
टिळक चौक परिसरातील भेळच्या गाडीवर काम करणारे कामगार किशोर फटाले कमी पगारातही समाधानी जीवन जगत होते. मात्र कोरोनामुळे लॉकडाउनचा फटका त्यांनाही बसला आहे. घरी पत्नी घरकाम करणारी, मुलगी सुश्‍मिताला तीन वर्षांपासून चक्कर येत असल्याने सुरू असलेला दोन वर्षांपासूनचा गोळ्यांचा कोर्स, कुटुंबाची मदार किशोर यांच्यावरच. त्यांनी काम करावं व घर चालावं. किशोर यांना घरी बसून राहणे म्हणजे कुटुंबाची उपासमार व मुलीच्या इलाजाला खंड पडणारे होते. त्यामुळे संचारबंदीतही त्यांनी घरीच चहा बनवून तो बाजारात विकायचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा चहा संचारबंदीत पिणार कोण? संचारबंदीत अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने सुरू असून त्यांना व लॉकडाउनमुळे अहोरात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनाही चहा लागते. त्यामुळे घरीच चहा बनवून थर्मासने चहा वाटपाची सेवा व अर्थार्जनही किशोर यांनी साध्य केले आहे. संचारबंदीतील अत्यावश्‍यक सेवेतील वस्तू वाढीव दराने विक्री होत असताना, जास्त नफ्याचा हाव न धरता किशोर हे केवळ पाच रुपयाला कट चहा विक्री करत आहेत. कर्तव्यावरील पोलिसांना मोफत चहा देऊन सेवा देत आहेत. सकाळी दोन तास व सायंकाळी एक तास या कालावधीत 300 ते 350 रुपयांचा व्यवसाय होतो. सर्व खर्च वजा जाता त्यांना 100 ते 150 रुपये हाती पडतात. 

भेळच्या गाडीवर कामावर होतो. मात्र संचारबंदीमुळे गाडी बंद असल्यामुळे आर्थिक संकट उद्‌भवणार होते. मुलगी सुश्‍मिताला तीन वर्षांपासून चक्कर येते. तिला तीन वर्षांचा गोळ्यांचा कोर्स आहे. महिन्याला 800 रुपयांच्या गोळ्या लागतात. अजून एक वर्षाचा कोर्स करावा लागणार आहे. त्यामुळे सायकलवर फिरून चहाची विक्री करत आहे. 
- किशोर फटाले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

Gangapur VIP Facility: गंगापूरमध्ये ३.७० कोटींच्या व्हीआयपी विश्रामगृहाचे लोकार्पण; शासकीय निवासस्थानांमुळे अधिकारी मुख्यालयी राहणार

SCROLL FOR NEXT