Pdr Kartiki 
सोलापूर

ना टाळ-मृदंग, ना टिपेला जाणारा जयघोष ! कार्तिकी दशमीला पसरली पंढरीत निरव शांतता

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढीनंतर कार्तिकी यात्रा देखील वारकऱ्यांच्या अनुपस्थितीत होत आहे. दरवर्षी यात्राकाळात हरिनामाचा जयघोष अन्‌ टाळ - मृदंगाच्या आवाजाने दुमदुमून जाणाऱ्या पंढरीत बुधवारी कार्तिकी दशमी दिवशी निरव शांतता होती. बुधवारी आणि गुरुवारी (25 आणि 26 नोव्हेंबर) शहरात संचारबंदी असल्याने सर्व रस्ते ऐन यात्राकाळात ओस पडले होते. 

आषाढी कार्तिकीच्या आनंद सोहळ्यास दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी येत असत. परंतु कोरोनाने सारे चित्रच बदलून गेले आहे. आषाढी यात्रेवेळी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी वारकऱ्यांना पंढरपुरात येण्यास शासनाने मनाई केली होती. त्यामुळे यात्रा प्रतिकात्मकरीत्या साजरी करण्यात आली होती. आता कार्तिकी यात्रेतही तशीच परिस्थिती आहे. वारकऱ्यांना पंढरपूरला येण्यास मनाई करण्यात आलेली असल्यामुळे वारकरी येऊ शकलेले नाहीत. परंतु, बंदोबस्तासाठी सतराशे पोलिस अधिकारी आणि कर्चाऱ्यांची फौज मात्र आलेली आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी शहराच्या सर्व भागात जाऊन बंदोबस्ताची पाहणी केली. 

संचारबंदीमुळे आज आणि उद्या (बुधवारी व गुरुवारी) शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मंदिराकडे आणि नदीच्या घाटांवर बॅरिकेडिंग करून जागोजागी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जेवणाची पाकिटे जागेवर पोच केली जात आहेत. शहरातील रॉबिनहूड आर्मीच्या कार्यकर्त्यांची त्यासाठी मदत घेण्यात येत आहे. 

ना जयघोष ना गजर..! 
यात्राकाळात पंढरपुरातील सर्व मठ, धर्मशाळा आणि चंद्रभागेच्या वाळवंटात सर्वत्र वारकरी हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ - मृदंगाच्या गजरात तल्लीन होत असतात. अवघी पंढरी दुमदुमून जात असते. परंतु वारकरी येऊ शकलेले नसल्याने दरवर्षी दशमी दिवशी टिपेला जाणारा जयघोष झाला नाही आणि टाळ - मृदंगाचा गजरही ऐकू आला नाही. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer बरा होतोय...! ICU मधून बाहेर, वाचा काय आहेत नवे अपडेट्स

Aditya Thackeray: वोटचोरी अन् बोगस मतदान...; निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरेंचा 'राहुल गांधी पॅटर्न'! मतदार यादीवरून मोठे खुलासे

Uddhav Thackeray Statement : ''मुंबईत अ‍ॅनाकोंडा येऊन गेला अन् भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची'' ; उद्धव ठाकरेंचं विधान!

Sonika Yadav Video: सात महिन्यांची गर्भवती जिद्दीने उभी राहिली! वेटलिफ्टिंग स्पर्धेत १४५ किलो भार उचलून जिंकले पदक

Swargate News : एसटीला ‘लाडकी बहिणच’ नकोशी! बससेवेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर भेदभाव

SCROLL FOR NEXT