karjmukti poster 
सोलापूर

कर्जमुक्ती : सोलापूर डिसीसीला मिळाले 129 कोटी 

प्रमोद बोडके

सोलापूर : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला आज 129 कोटी रुपये मिळाले आहेत. शासनाकडून ही रक्कम मिळाल्यानंतर 48 तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या गूडन्यूजचे मेसेज मिळणार आहेत. 
हेही वाचा - मंगळवेढा तालुक्‍यातील 323 शेतकरी अपात्र...कर्जमाफी लाभार्थ्यांची संख्या पहा 
साधारणतः 14 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी डीसीसी बॅंकेला 129 कोटी रुपये मिळाले आहेत. कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, राष्ट्रीयकृत बॅंका यांच्यावतीने संबंधित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी युद्ध पातळीवर यंत्रणा कामाला लागली आहे. कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीत जिल्ह्यातील 67 हजार 810 शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी 37 हजार 69 शेतकरी हे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कर्जदार आहेत. 
हेही वाचा - बळिराजा चिंतेत! अवकाळी मदतीसाठी पैसेच नाहीत 
दुसऱ्या यादीतील 67 हजार 810 शेतकऱ्यांपैकी आज सायंकाळी साडेसातपर्यंत 52 हजार 155 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे. जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे म्हणाले, कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीबाबत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समितीकडे 858 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रार झाल्यानंतर लगेच 69 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. पात्र शेतकऱ्यांना कमीत कमी वेळेत लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT