सोलापूर : लसीच्या प्रमाणपत्राशिवाय डिसेंबरचा मिळणार नाही पगार sakal
सोलापूर

सोलापूर : लसीच्या प्रमाणपत्राशिवाय डिसेंबरचा मिळणार नाही पगार

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा कोरोना वाढणार

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा कोरोना वाढणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. गावोगावी लसीकरण केंद्रे सुरु करून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. तरीही, जिल्ह्यातील 11 लाख 10 हजार व्यक्‍तींनी लस टोचलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर आता अशा व्यक्‍तींना ग्रामपंचायतींमधून कोणताही दाखला मिळणार नाही. दुसरीकडे शासकीय कर्मचाऱ्यांना पगारपत्रकासोबत लसीचे प्रमाणपत्र जोडावे लागणार असून त्याशिवाय त्यांना डिसेंबरचा पगार दिला जाणार नाही, असे आदेश झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांनी काढले आहेत.

देशभरात कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरण फेब्रुवारीपासून सुरु झाले आहे. राज्यातील 18 वर्षांवरील जवळपास 10 कोटी व्यक्‍तींनी लस टोचणे अपेक्षित असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील 43 लाख 80 हजार व्यक्‍तींचा समावेश आहे. मागील साडेआठ महिन्यानंतरही सोलापूर ग्रामीणमधील साडेआठ लाख तर शहरातील अडीच लाखांहून अधिक व्यक्‍तींनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांनी दुसरा तर कोवॅक्‍सिन लस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घेणे आवश्‍यक आहे. तरीही, अंदाजित एक लाखांहून अधिक व्यक्‍ती दुसरा डोस घेण्यासाठी आल्याच नाहीत, हे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी त्यांच्यावर कडक निर्बंध घालण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

प्रवास व दुकानात जाण्यासाठी प्रमाणपत्राचे बंधन

दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, असा वर्तविण्यात आला आहे. तत्पूर्वी, सर्वांचेच लसीकरण व्हावे म्हणून गावागावातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शहरातील नागरी आरोग्य केंद्रे, महाविद्यालयांच्या ठिकाणी लसीकरण कॅम्प आयोजित केले जात आहेत. तरीही, बहुतेकजण कोरोना गेला, लस टोचल्यावर काहीतरी होईल, या गैरसमजतीतून लस टोचून घेत नाहीत. त्यामुळे आता प्रवास करताना संबंधितांकडे लस टोचल्याचे प्रमाणपत्र नसल्यास त्यांना दंड भरावा लागेल अथवा त्यांना प्रवास करता येणार नाही. तसेच दुकानांमध्ये प्रवेश करताना त्यांना प्रमाणपत्र दाखवावे लागेल, अन्यथा दुकानात जाता येणार नाही, असे निकष लावले जातील, असेही सीईओ स्वामी यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला प्रस्ताव

प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका खूपच कमी आहे. सर्वजण सुरक्षित राहावेत म्हणून 18 वर्षांवरील सर्वांना प्रतिबंधित लस टोचावी, असे आवाहन करूनही काहीजण लस टोचून घेत नाहीत. त्यांच्यावर कडक निर्बंध घातले जाणार आहेत.

- दिलीप स्वामी, सीईओ, सोलापूर जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT