Vitthal 
सोलापूर

विठ्ठलाच्या गर्भगृहातील स्नानानंतर अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ; "यांनी' केली कारवाईची मागणी 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठलाच्या प्रक्षाळ पूजेदरम्यान मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी विठ्ठलाच्या गर्भगृहात स्नान करून वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण घाडगे यांनी केली आहे. याच प्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. दरम्यान, स्नानानंतर अधिकाऱ्यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. 

या प्रकरणी मंदिर समिती काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. आषाढी यात्रेची प्रक्षाळ पूजा 9 जुलै रोजी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते झाली. पूजेदरम्यान विठ्ठलाला अभिषेक व स्नान करण्यात आले. याच दरम्यान मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशीही उपस्थित होते. पूजेदरम्यान एका पुजाऱ्याने कार्यकारी अधिकारी श्री. जोशी आणि व्यवस्थापक श्री. पुदलवाड यांनाही देवाच्या समोरच स्नान घातले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. 

याविषयी भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी हा प्रकार निषेधार्ह असल्याचे सांगत अधिकाऱ्यांच्या या स्नानाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर संभाजी ब्रिगेड आणि भाजपने या प्रकारचा निषेध केला आहे. संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे यांनी दोषी अधिकाऱ्यांवर मंदिर समितीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तर भाजपचे तालुकाध्यक्ष संजय वाईकर यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी लेखी मागणी केली आहे. स्नानानंतर अधिकाऱ्यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

Ravikiran Ingawale : 'शरद कोराणे यांना कारागृहात इंजेक्शन देऊन संपवलं...'; रविकिरण इंगवलेंच्या व्हायरल ऑडिओमुळे खळबळ, कोराणे कुटुंबाची सखोल चौकशीची मागणी

ZP School Mathjalgav: पाच वर्गखोल्या धोकादायक, १२५ विद्यार्थ्यांसाठी एकच खोली; मठजळगावच्या शाळेची दुरवस्था

Latest Marathi News Live Update : 'मला हनुमानाने वाचवले': पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना स्मित मच्छार यांनी भगवद्गीतेचाही केला उल्लेख

Purnekar Murder Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा मोठा खुलासा; राजकीय दबावाचा आरोप, पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT