fake facebook accounts
fake facebook accounts esakal
सोलापूर

न्यायाधीश अन्‌ 'एसपीं'च्याच फेक फेसबुक अकाउंटवरुन पैशांची मागणी

तात्या लांडगे

सोलापूर : मी अडचणीत आहे, मला पैशांची खूप गरज आहे, तुम्ही मला ऑनलाइन (Online) पैसे तत्काळ पाठवा, असा जवळच्या व ओळखीतील व्यक्‍तींना जिल्ह्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या फेसबुक अकाउंटवरून (facebook accounts) आला. त्यांना खरोखर पैशांची गरज असेल म्हणून काहींनी त्यांच्या परीने दहा हजार रुपये ऑनलाइन पाठविले. दुसऱ्या घटनेत थेट ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्याच नावे बनावट फेसबुक अकाउंट (fake facebook accounts) तयार करून सात हजार रुपये उकळले. उत्तरप्रदेश व राजस्थानातील दोन्ही संशयित आरोपींच्या मुसक्‍या ग्रामीण पोलिसांनी आवळल्या.

न्यायाधीशांचेच बनावट फेसबुक खाते उघडून त्यावरून पैसे मागितल्याप्रकरणी जानेवारीत माढा पोलिस ठाण्यात (Madha Police Station) गुन्हा दाखल झाला. या प्रकरणातील गुन्हेगाराचा शोध (Criminal Search) सुरु असतानाच ऑक्‍टोबर महिन्यात पोलिस अधीक्षकांचेच बनावट फेसबुक अकाउंट (fake facebook accounts) तयार करून त्यावरूनही पैसे मागण्यात आले. या प्रकरणी त्या अनोळखी व्यक्‍तीविरुध्द सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाला. दोन्ही प्रकार गंभीर असल्याने सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत पाडुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी त्या गुन्ह्यांचा तांत्रिक तपास केला. त्यानंतर त्यांनी उत्तरप्रदेश व राजस्थान याठिकाणी अधिकारी पाठवून त्या दोन्ही संशयितांना पकडले. मनोजकुमार नथुसिंग पाल (रा. पांचलीबुजुर्ग, मेरठ, उत्तरप्रदेश) आणि देवकरण हनुमानसिंग रावत (रा. फारकिया, अजमेर, राजस्थान) यांना जेरबंद केले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक शांताराम शेळके, पोलिस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले, शैलेश खेडकर, सुरज निंबाळकर, पोलिस अंमलदार मनोज भंडारी, मोहन मनसावले, विशाल टिंगरे, सचिन मसलखांब, सचिन दरदरे, अन्वर अत्तार, अर्जुन केवळे यांच्या पथकाने केली. न्यायालयाने त्या दोघांनाही 20 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

पोलिसांकडून नागरिकांना आवाहन...

- फेसबुक प्रोफाईलची माहिती व फोटो लॉक करा; अनोळखी व्यक्‍तीची रिक्‍वेस्ट स्वीकारु नका

- फेसबुकवरील मित्र दिसणार नाहीत म्हणून 'ओन्ली मी' हा पर्याय निवडावा

- फेसबुकवरून कोणी पैसे मागत असल्यास समोरील व्यक्‍ती तीच आहे का, याची खात्री करा

- बनावट फेसबुक अकाउंट कोणी तयार केल्यास pretending to me हा पर्याय निवडून ते तत्काळ बंद करा

- कोणत्याही व्यक्‍तीला ऍप, फोन, एसएमएसद्वारे बॅंक खात्याची, डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती देऊ नका

- कोणत्याही कंपनी, सर्व्हिसेसची माहिती कस्टमर अेकर नंबर, गुगलवर शोधू नका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनचे साइड इफेक्ट्स समोर; वाचा नव्या अभ्यासात काय काय आढळले

Video: सभा माझी पण हवा तुमची.. ! मोदींनी देखील केलं त्या दोघांचं कौतुक, यूपीतल्या रॅलीमध्ये काय घडलं?

Hansal Mehta: हंसल मेहता यांनी केली 'स्कॅम-3'ची घोषणा, हर्षद मेहता अन् तेलगीनंतर आता कुणाची कथा मांडणार? जाणून घ्या...

फक्त 2 पानांचा बायोडाटा, अन् थेट Google, Microsoft मध्ये मिळाली नोकरीची संधी, भारतीय वंशाच्या तरुणीची कमाल!

Latest Marathi News Live Update: दिल्ली पोलिसांचे 2 अधिकारी स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले

SCROLL FOR NEXT