Kanda_ 
सोलापूर

शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज...ठाकरे सरकारचे मोदी सरकारला पत्र 

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये कांद्याचे उत्पादन घटल्याने कांद्याचे दर वाढले. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदीचा निर्णय घेतला. आता देशभर कांद्याची आवक वाढली असून कांद्याचे दर गडगडल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. कांद्याचे दर स्थिर राहण्यासाठी निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा, असे पत्र ठाकरे सरकारने मोदी सरकारला पाठविले आहे. 850 डॉलरचे निर्यातमूल्यही टप्प्याटप्याने शून्य करावे, असेही त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 


महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील विविध राज्यातील अतिरिक्‍त उत्पादित कांदा 'अपेडा'च्या माध्यमातून परदेशात निर्यात केला जातो. महाराष्ट्रातून 2016- 17 ते 2018-19 या तीन वर्षांत एकूण 61 लाख 88 हजार मे. टन कांदा परदेशात निर्यात झाला. सर्वाधिक कांदा बांग्लादेशात निर्यात झाला तर उर्वरित कांदा युएई, मलेशिया, नेपाळ, श्रीलंका, शिंगापूर, आफ्रिका, ब्राझिल, इंग्लंड, सोव्हिएत रशिया, इटली, चीन, नेदरलॅण्ड, हॉंगकॉंग, हंगोला या देशात निर्यात करण्यात आला. मागील वर्षी दुष्काळ तर यावर्षीचा महापूर व अवकाळीमुळे कांदा लागवडीचे क्षेत्र घटले आणि कांदा उत्पादन कमी झाले. त्यामुळे कांद्याचे दर प्रतिक्‍विंटल 20 हजारांपर्यंत पोहचले. त्यामुळे केंद्र सरकारला परदेशातून कांदा आयात करावा लागला. दरम्यान, आता कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढल्याने बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. मात्र, कांद्याचे दर प्रतिक्‍विंटल सरासरी दिड ते दोन हजारांवर पोहचल्याने बळीराजा अडचणी सापडला आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा, त्यांचा उत्पादन खर्च निघावा या हेतूने केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी, असेही त्या पत्रात म्हटले आहे. 

निर्यातमूल्य मागे घ्या अन्‌ निर्यातबंदी उठवण्याचे पत्र 
देशभरात कांद्याचे दर वाढल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केली. आता महाराष्ट्रात कांद्याची आवक वाढली असून कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्‍वभूमीवर बळीराजासाठी कांद्यावरील निर्यात बंदी मागे घ्यावी, किमान निर्यातमूल्यही टप्प्याटप्याने शून्य करावे, असे पत्र राज्य सरकारने केंद्राला पाठविले आहे. 
- यु. एस. घाद्याळे, उपसचिव, पणन 


राज्यातील कांदा निर्यात (2016 ते 2019) 
सन             कांदा निर्यात 
2016-17    24.16 लाख मे.टन 
2017-18    15.89 लाख मे.टन 
2018-19    21.83 लाख मे.टन 
2019-20    14.27 लाख मे.टन (अपेक्षित) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

SCROLL FOR NEXT