solar pump.jpg 
सोलापूर

सौर कृषी पंप योजना सर्व तालुक्‍यासाठी देण्याची मागणी 

नानासाहेब पठाडे

पोथरे(सोलापूर) : शासनाच्या वतीने सुरू असलेली मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याची आहे. मात्र सध्या ही योजना सोलापूर जिल्ह्यातील केवळ अक्कलकोट तालुक्‍यासाठीच सुरू असून ही योजना सर्व तालुक्‍यात सुरू करावी अशी मागणी पोथरे तालुका करमाळा येथील शेतकऱ्यांनी केली आहे. 

ज्या भागात विजेची उपलब्धता नाही अश्‍या ठिकाणी सौर उर्जा बसून तेथील भाग बागायती करण्यासाठी महावितरणच्या वतीने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरू आहे. या योजने अंतर्गत साडेसात अश्वशक्तीच्या कृषी पंपासाठी महावितरणच्या वेबपोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र ऑनलाईन वेबसाईटवर सोलापूर जिल्ह्यातील केवळ अक्कलकोट तालुका ओपन होत आहे. 

करमाळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांची याबाबत निराशा निर्माण झाली आहे. करमाळा तालुक्‍यातील उत्तर भागात शेततळे, माळरानावर, नदी परिसर अशा अनेक ठिकाणी विजेची उपलब्धता नाही. या ठिकाणी सौर ऊर्जेची नितांत गरज आहे. त्यामुळे शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन ही योजना सर्व तालुक्‍यात सुरू करून विजेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. 

विजेच्या उपलब्धतेचा सर्वे करून योजना द्यावी 
ज्या भागात विजेची उपलब्धता नाही अशा ठिकाणचा सर्वे करून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा देणे गरजेचे आहे. 
- शहाजी झिंजाडे शेतकरी पोथरे. 

योजना सर्वच ठिकाणी सूरू करावी 
सौर ऊर्जेसाठी मर्यादित क्षेत्र ठेवणे हे चुकीचे धोरण आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी शेततळे निर्माण केले आहेत. अशा ठिकाणी विजेची उपलब्धता नसल्याने सौर ऊर्जेची गरज आहे. त्यामुळे ही योजना सर्व ठीकाणी सुरू करावी. 
- तुषार शिंदे शेतकरी जातेगाव  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT