vijaykumar deshmukh 
सोलापूर

देशमुखांना विश्‍वास महापालिकेत पुन्हा सत्तेत येण्याचा 

प्रमोद बोडके

सोलापूर : महापालिकेत भाजपची सत्ता आहे. केंद्रात सत्ता आहे. राज्यात सत्ता असताना आम्ही सोलापूरच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या. या विकासकामांची पोचपावती म्हणून 2022 च्या सोलापूर महापालिका निवडणूकीत भाजपला पुन्हा एकहाती सत्ता मिळेल असा विश्‍वास माजी पालकमंत्री तथा भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला आहे. 
हेही वाचा - कलमाडी अन्‌ पवारांचे पुणे आता भाजपचे झाले 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत आज सोलापूर शहर भाजपचा अध्यक्ष निवडण्यासाठी शांतिसागर मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी, शहराध्यक्ष निवडीचे निवडणूक अधिकारी नितीन काळे, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, पांडुरंग दिड्डी, महापालिका सभागृह नेते श्रीनिवास करली, शशी थोरात आदी उपस्थित होते. आमदार देशमुख म्हणाले, राज्यात ज्यांनी भाजपला फसवूण सत्ता स्थापण केली आहे. त्या सर्वांना (शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस) आगामी महापालिका निवडणूकीत सोलापूरची जनता धडा शिकवेल. भाजपला फसवूण राज्यात सत्ता स्थापन झाल्याने जनतेत नाराजी आहे. राज्यातील जनतेची नाराजी आणि केंद्र सरकारने देश हितासाठी केलेले कायदे यामुळे भाजप पुन्हा सत्तेत येईल असा विश्‍वासही आमदार देशमुख यांनी व्यक्त केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

Ketu Nakshatra Gochar: केतू मघा नक्षत्र परिवर्तनात करेल प्रवेश , जाणून घ्या कोणत्या राशींच्या वाढणार समस्या

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस टंचाई

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

SCROLL FOR NEXT