Devendra Fadanvis  sakal
सोलापूर

Devendra Fadanvis: पराभवाची जबाबदारी सामूहिक, निर्णय मागे घ्या, आपल्या मार्गदर्शनाची गरज!

समाधान आवताडे यांनी केली केली विनंती

हुकूम मुलाणी ​

Solapur News: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळाले नसल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास या पदाच्या जबाबदारीतून मोकळे करा अशी विनंती पक्ष नेतृत्वाला केली.

मात्र राज्याच्या राजकारणात व सरकारमध्ये आपल्या मार्गदर्शनाची गरज असून लोकसभा निवडणुकीतील पराभव हा एकट्याचा नसून सामूहिक आहे त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आ. समाधान आवताडे यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यशाची झालेली प्रगती जागतिक स्तरावर उंचावलेली देशाची मान व राज्यात महायुतीची सत्ता असल्याने भाजपला चांगले यश मिळेल अशी दृष्टीने जोरात प्रयत्न करण्यात आले. परंतु निकालानंतर राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही.

शेतकरी मजूर महिला यांची नाराजी या निकालात दिसून आली लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर पडलेल्या मताचा आढावा घेऊन व आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबई येथे घेतलेल्या बैठकीत आपणास या पदाच्या जबाबदारीतून मोकळे करा अशी विनंती केंद्रीय नेतृत्वाला केल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली.

पंढरपूर मंगळवेढ्यातील भाजप आ.समाधान आवताडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना लोकसभा निवडणुकीत झालेला पराभवाची जबाबदारी आपल्या एकट्याची नसून भाजप टीमची आहे.

भाजप कार्यकर्त्यांच्या मनात खोलवर जखम झाली. पुन्हा पेटून यशाचे शिखर गाठण्यासाठी साहेब आपले मार्गदर्शन पक्षात आणि सरकारमध्ये हवे आहे.

त्यामुळे आपण घेतलेला निर्णय मागे घेण्याबाबतची विनंती त्यांनी आपल्या मागणी द्वारे केली. दरम्यान पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतून समाधान आवताडे यांना आमदार करण्यात महत्त्वाची भूमिका देखील त्यांनी घेतली. त्याचबरोबर सातत्याने त्या इथल्या प्रश्नावर व या मतदारसंघातील राजकीय हालचालीवर लक्ष ठेवून होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Cold Wave : महाराष्ट्रातील थंडीची लाट ओसरणार? हवामान विभागाचा असा असेल पुढील अंदाज

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर; द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा प्रयत्न

Sangli Politics : 'महापालिकेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार'; जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांची मोठी घोषणा

माेठी बातमी! सातारा जिल्ह्यातील ड्रग्‍ज प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे?; विशाल मोरेसह सात जणांना अटक, कोण आहे सलीम डोला?

Railway : पुणे-मुंबई-पुणेची ‘प्रतीक्षा’ संपली; लोणावळ्यात लोहमार्गाचे विस्तारीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT