माजी मंत्री दिलीप सोपल Sakal
सोलापूर

मी हरलोय पण थकलो नाही! सोपलांची गर्जना; 'महाविकास'ने थोपटले दंड

मी हरलोय पण थकलो नाही! सोपलांची गर्जना; महाविकास आघाडीने थोपटले दंड

प्रशांत काळे

गत निवडणुकीत मी हरलो असलो तरी मी थकलो नाही, असा इशाराच माजी मंत्री दिलीप सोपल यांनी विरोधकांना दिला आहे.

बार्शी (सोलापूर) : दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत (Shiv Sena) जाण्याचा माझा निर्णय योग्यच होता अन्‌ तेथे दोन्ही कॉंग्रेसला (Congress) आमच्यासोबत यावे लागले आहे. राजकारणात संस्कार जोपासले पाहिजेत. मतभेद जरूर असावेत, पण वैयक्तिक संबंधही चांगले असावे लागतात. विचार चांगले असावेत. राजकारणात द्वेष नव्हे तर त्वेष असायला पाहिजे. गत निवडणुकीत मी हरलो असलो तरी मी थकलो नाही, असा इशाराच माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांनी विरोधकांना दिल्याने तालुक्‍याच्या राजकीय क्षेत्रात याची चर्चा सुरू झाली आहे.

कोरोना संसर्गाच्या लॉकडाउनमध्ये शिथिलता येताच राजकीय कार्यकमांना सुरवात झाली असून, बार्शी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील जिल्ह्याची नेतेमंडळी व्यासपीठावर जमली अन्‌ बार्शी नगरपरिषद निवडणुकीत आम्ही एकदिलाने विरोधकास टक्कर देणार आहोत, असे रणशिंगही फुंकले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, सोलापूर महापालिकेचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, जिल्हा परिषद सदस्या रेखा राऊत, शिवसेना शहरप्रमुख दीपक आंधळकर, राष्ट्रवादी महिला जिल्हाप्रमुख ऍड. सुप्रिया गुंड- पाटील, विक्रम सावळे, योगेश सोपल अशी मंडळी यावेळी जमली होती. तर राजेंद्र मिरगणे, भाऊसाहेब आंधळकर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांचा दौरा सुरू असल्याने येऊ शकलो नाही, असा निरोप कार्यक्रमावेळी पोच करून मी तुमच्या सोबत असल्याचे जाहीर केले.

सोपल यांनी यावेळी आपल्या शैलीमध्ये विरोधकांचे नाव न घेता टीका करताना म्हटले की, बार्शीकरांना ते संस्कार माहीत होते पण मध्यंतरी त्यात खंड पडला आहे. वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न होत आहे. वाढती राक्षसी प्रवृत्ती जनतेने लक्षात घेतली पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी पवारसाहेबांवर टोकाची टीका केली, पण तेवढेच कौतुक बाळासाहेब करीत होते. त्यामुळे त्यांना कोणीही विसरू शकत नाही. बार्शी तालुक्‍यातील जनतेने मला आठ विधानसभा निवडणुकांपैकी सहा निवडणुकांमध्ये सेवा करण्याची संधी दिली. तीस वर्षांपेक्षा जास्त काळ जनतेची वकिली करीत आहे. पहिला प्यार कभी भूला नही जाता, असे म्हणून त्यांनी शरद पवार यांच्यावर तेवढेच प्रेम असल्याचे सांगून सभागृहात वाहवा मिळवली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविकास आघाडीने आगामी नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दंड थोपाटले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

आजचे राशिभविष्य - 5 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT