dargo patil.jpg 
सोलापूर

मानकऱ्यांच्या घरात झाली दीप स्थापना ; ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वर यात्रा 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्‍वरांच्या यात्रेसाठी आज शहरातील दर्गो-पाटील कुटुंबीयांच्या निवासस्थानी मानाचा दिवा प्रज्वलीत करून यात्रेच्या विधीला प्रारंभ करण्यात आला. त्यासाठी मानकरी व भक्तगणांनी हजेरी लावली. 

यात्रेमध्ये सुरुवातीला मानकऱ्यांच्या घरी मानाचे दिवे लावण्याची परंपरा आहे. त्यानुसार आज सकाळी मल्लिकार्जुन मंदिर परिसरातील दर्गो-पाटील कुटुंबाच्या घरी मानाचा दिवा लावण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी दर्गो-पाटील कुटुंबीयासह मानकरी राजशेखर हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू हे उपस्थित होते. तसेच अनेक भक्तांनीदेखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सुरवातीला दिवा लावून नैवेद्य अर्पण करण्यात आला. तसेच भक्तगणांना प्रसाद वाटप करण्यात आले. 
कैलास भोगडे व परिवाराच्या घरीदेखील मानाचा दिवा लावण्यात आला. यासोबत बिपीन धुम्मा यांच्या निवासस्थानीदेखील मानाचा दिवा प्रज्वलीत करण्यात आला. प्रत्येक कुटुंबामध्ये बसवलेला दिवा पाच दिवसानंतर उठतो. विविध मानकऱ्यांच्या घरी हा मानाचा दिवा प्रज्वलीत करण्यात आला. यावेळी मानकरी कुटुंबांच्या नातेवाईकांसह सहभागी झाले होते. 
मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले की, आजपासून श्री सिध्दरामेश्‍वराच्या यात्रेचे विधी मानकऱ्यांच्या घरी दीप लावून सुरू होत आहेत. यामध्ये दर्गो-पाटील, धुम्मा, हिरेहब्बू, मुस्तारे, कडके यांच्याकडे दिवा बसतो. इतर मानकऱ्यांच्या घरीदेखील दिवा बसवण्याचा विधी होईल. त्यानंतर ता. 10 जानेवारी रोजी शेटे यांच्या वाड्यामध्ये पुढील धार्मिक विधी होईल. 

नंदीध्वजांची स्थापना होणार 

या वर्षी यात्रेवर कोरोनाचे सावट आहे. आता फक्त नंदीध्वजाच्या कार्यक्रमासाठी प्रशासनाने लवकरात लवकर परवानगी द्यावी. भक्तांचा उत्साह पाहता प्रशासनाने परवानगी दिली पाहिजे. सर्व नंदीध्वज ठरलेल्या वेळेनुसार त्या त्या भागात स्थापन केले जातील. प्रशासनाच्या परवानगीने पुढील निर्णय घेतले जातील. मात्र नंदीध्वज स्थापन केले जाणार असल्याचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अयानचा आणखी एक कारनामा उघड; थार गाडी, नोटांचे बंडल अन् पिस्तूल आली कुठून? मोठा खुलासा...

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवारांसाठी सुप्रिया सुळे मैदानात; बारामतीमधील सभेला जाणार

Gold Rate Today: उच्चांकापासून सोनं 25 हजारांनी स्वस्त! आजचा 1 तोळ्याचा ताजा भाव काय?

Indian Hockey Team: ३६ खेळाडू, एकच लक्ष्य! भारताचा हॉकी संघ जिंकण्यासाठी सज्ज; सरावाला जोरदार सुरुवात

Hasan Mushrif Gokul Controversy : गोकुळ दूध संघातील आतली बातमी आली! मंत्री हसन मुश्रीफ यांना वगळून महायुती पॅनेल करणार

SCROLL FOR NEXT