दादाचं पक्षांतर अन्‌ जमा-खर्चाचा हिशेब !
दादाचं पक्षांतर अन्‌ जमा-खर्चाचा हिशेब ! Canva
सोलापूर

दादाचं पक्षांतर अन्‌ जमा-खर्चाचा हिशेब !

सकाळ वृत्तसेवा

आरं लगा त्यो आनंददादा राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावर हाय की ! मग..? लगा भविष्याचा येध घेणारा त्यो... त्येनं वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकलाय...

आरं लगा त्यो आनंददादा राष्ट्रवादीच्या (NCP) उंबरठ्यावर हाय की ! मग..? लगा भविष्याचा येध घेणारा त्यो... त्येनं वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) रामराम ठोकलाय... सोलापुरात (Solapur) राष्ट्रवादीचं भविष्य काय अन्‌ दादाचं राजकारण काय या संदर्भात सगळे चाणक्‍य आपापल्या परीनं गणितं मांडू लागल्याती..! इरोधात असतानाचा दादाचा आक्रमकपणा राष्ट्रवादीत गेल्यावर राहणार का? याचीबी चरचा होऊ लागलीया..!

पन देवा वंचितमदी असताना कायबी मिळण्याची शक्‍यता नसल्यानं तसंच राष्ट्रवादीत राज्याच्या सत्तेच्या वाट्यात असल्यानं येगळा निधी, फुडच्या विलेक्‍शनमधी महापालिकेत सत्ता आली तर महत्त्वाचं एखादं पद, राज्याच्या राजकारणातील हुद्दा, एकादं महामंडळ पदरात पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाय... महापालिकेच्या राजकारणात शिवसेनेतून राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या महेशअण्णाची ताकद लईच मोठी हाय... महापालिका विलेक्‍शनमदी अण्णा काय खेळी खेळणार याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलं हाय... कॉंग्रेसमदून सेनेत आल्यानंतर अण्णानं महापालिकेत सेनेची ताकद वाढवली व्हती... पण अंतर्गत राजकारणानं त्येंचा पॅटीसच झाला. तवा अण्णानं सरळ थोरल्या सायबास्नी भेटूनशान राष्ट्रवादीचा रस्ता धरलाय... पण तिथंबी अंतर्गत धुसफूस हायंच... त्यामुळं अण्णाचा परवेश दिवसेंदिवस लांबतुया... यातून अण्णाला फुडच्या विलेक्‍शनमदी काय फायदा होणार हे लवकरच समजंल...

राष्ट्रवादी परवेशाबाबत दादानं अजून पत्ते उघडले नायती... पण एकिकडं शहर उत्तरच्या राजकारणाच्या चाव्या हातात येण्याची शक्‍यता... अन्‌ दुसरीकडं अण्णाला इधान परिषदेवर घेतलं तर? हा बी मुद्दा लई इचारात घेण्यासारखा हाय... सद्यातरी दादाची पालकमंत्री मामाशी लईच जवळीक हाय... आपल्या भागाच्या इकासासाठी येगळा निधी ओढून आणत दादानं आपली ताकद दाखवायला सुरवात केलीच हाय म्हना...

पहिलं बहुजन समाज पक्षातून नंतर वंचितमधून दादानं काम केलं... महापालिकेत गटनेता म्हनूनशान काम करताना दादा कट्टर इरोधक म्हनूनशान आक्रमकपणे ठसा उमटवत हुताच... कार्यसम्राट म्हनूनशान सगळेच दादाला वळखत व्हते... आता वंचितमदी राहून फार काय हाताला लागल असं वाटत नसल्यानं दादानं पक्ष बदलायचा निर्णय घेतला... शहर इकासाच्या परश्‍नावर दादानं पार्टी बदललीया म्हनत्यात... बघूया काय काय पदरात पडतंया ते? कसा जमा-खर्चाचा ताळमेळ लागतुया ते!

- थोरले आबासाहेब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT