majur training.jpg
majur training.jpg 
सोलापूर

डाळिंब छाटणी औजारांचे निर्जंतुकीकरण महत्वाचे : आत्मा'चे प्रकल्प संचालक मदन मुकणे 

हुकूम मुलानी

मंगळवेढा(सोलापूर)ः डाळिंब छाटणीच्यावेळी रोग प्रसार प्रतिबंधक उपाय योजना करताना छाटणी औजाराचे निर्जंतुकीकरण करण्याबाबत काळजी घेण्याची आवश्‍यकता असल्याचे प्रतिपादन आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे यांनी केले. 

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग यांच्या वतीने कौशल्य विषयक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत फळबाग छाटणी मजुराचे प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सर्जेराव तळेकर, तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे, राजेंद्र भांगे, मारूती कौलगे, विषय विशेषज्ञ विज्ञानविद्या विकास भिसे, निर्यातक्षम डाळींब उत्पादक शेतकरी सत्यवान लेंडवे उपस्थित होते. 

श्री. मुकणे म्हणाले, छाटणी पूर्वनियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करत तेलकट डाग रोगाचे नियंत्रण एकट्याने करावयाचे नसून समूहाने म्हणजेच प्रत्येक डाळिंब उत्पादकांनी एकत्रितपणे उपाय करणे आवश्‍यक आहे तरच याचा प्रतिबंध करणे शक्‍य होईल. उपविभागीय कृषी अधिकारी तळेकर म्हणाले, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी विश्रांती काळातील व बहार घेण्यापूर्वी दोन स्वतंत्र छाटणी केल्यास झाडाची वाढ व्यवस्थित होते. मर रोगाचे नियंत्रण कसे करावे या विषयावर मजूरांना मार्गदर्शन केले. निर्यातक्षम डाळिंब उत्पादक शेतकरी सत्यवान लेंडवे म्हणाले, निर्यातक्षम डाळिंब उत्पादन करताना तंत्रशुद्ध छाटणी अत्यंत महत्त्वाची आहे. उत्तम दर्जाची फळे उत्पादित करणे शक्‍य होईल आणि विश्रांती काळात डाळिंब बागेत पुरेशे खत देऊन झाडाची वाढ नियंत्रित ठेवून बागेचे पोषण चांगल्या प्रकारे होईल याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. प्रास्ताविक कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी केले. कृषी सहायक प्रशांत काटे यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम सावंजी यांनी आभार मानले. मजूर नोंदणीसाठी राजकुमार ढेपे व मनीषा कव्हाळे यांनी सहकार्य केले.  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT