सोलापूर

आषाढी वारी यंदाही प्रतिकात्मकच

तात्या लांडगे

कोरोनामुळे पायी वारी रद्द करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाठविण्यात आला आहे.

सोलापूर : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अजूनही पूर्णपणे आटोक्‍यात आलेला नाही. दुसरीकडे तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात असल्याने गर्दीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यंदाची आषाढी वारीही (ashadi wari) प्रतिकात्मक (Symbolic) स्वरूपातच साजरी व्हावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (district collector milind shambharkar) यांनी मदत व पुनर्वसन विभागाला पाठविल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यावर पुढील दोन दिवसांत अंतिम निर्णय होईल. (district collector milind shambharkar has proposed to the government that ashadi wari should be celebrated in a symbolic manner this year)

पंढरीच्या आषाढी वारीच्या अनुषंगाने 14 जून रोजी संत मुक्‍ताईंची पालखी (दिंडी) प्रस्थान करणार आहे. त्यानंतर विविध टप्प्यांवरती संतांच्या पालख्या पंढरीकडे निघतात. परंतु, कोरोनामुळे सर्वसामान्यांसह सर्वांचे हाल झाले असून अनेकांना त्यात जीव गमावावा लागला आहे. या काळात हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाले नाहीत. आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढला होता. या परिस्थितीचा अनुभव पाहता आषाढी वारीचा सोहळा यंदाही प्रतिकात्मक स्वरूपातच साजरा व्हावा. कोरोनामुळे पायी वारी रद्द करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाठविण्यात आला आहे. मंदिर समितीकडून प्रातांधिकारी सचिन ढोले यांच्याकडे प्रस्ताव आला. त्यानंतर त्यांनी वारीसंदर्भात अभिप्राय देऊन तो प्रस्ताव पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठविला. पोलिस प्रशासनाच्या अभिप्रायानंतर तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

प्रस्तावातील ठळक बाबी...

- वारकरी सांप्रदायाच्या प्रथा-पंरपरा जपताना कोरोना वाढून समाजजीवन पुन्हा विस्कळीत होण्याची शक्‍यता आहे

- प्रतिकात्मक वारी साजरी करून गर्दी टाळणे शक्‍य आहे; चंद्रभाग स्नान वगैरे प्रथा-परंपरा प्रशासनाकडून जपल्या जातील

- कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवरील तणाव लक्षात घेता वारीचा सोहळा प्रतिकात्मक स्वरूपात साजरा करणेच योग्य राहील

- ज्या-ज्या जिल्ह्यांमधून मानाच्या पालख्या निघतात, तेथील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधितांना आदेश द्यावेत

- महाराष्ट्राच्या शेजारील राज्यातून पंढरपुरात कोणी भाविक येणार नाहीत, यादृष्टीनेही प्रशासनाने उपायोजना कराव्यात

मदत व पुनसर्वसन विभागाचे म्हणणे...

राज्यातील काही जिल्ह्यांमधील निर्बंध अजूनही पूर्णपणे शिथिल झालेले नाहीत. पंढरीच्या पांडुरंगाच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशसह विविध राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. वारीवेळी होणारी गर्दी पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. त्यातून तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळेल, अशी भिती आहे. त्यामुळे यंदाची आषाढी वारी मागील वर्षीप्रमाणेच साजरी करणे सर्वांसाठी सुरक्षित आहे. मानाच्या पालख्या हेलिकॉप्टर अथवा एसटीतून आणल्या जाव्यात, असे मदत व पुनर्वसन विभागाचे म्हणणे आहे. त्यावर आज (गुरूवारी) सविस्तर चर्चा होऊन हा विभाग आपला अभिप्राय शासनाला देणार असल्याची माहिती विश्‍वसनिय सूत्रांनी दिली. (district collector milind shambharkar has proposed to the government that ashadi wari should be celebrated in a symbolic manner this year)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : ''घरी बसलेले होते म्हणून त्यांना बॉम्बस्फोटातील आरोपी...'', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

Share Market Closing:: चढ-उतारानंतर शेअर मार्केट वाढीसह बंद, जाणून घ्या कशी आहे शेअर्सची स्थिती!

पिता-पुत्रामध्ये होणार होती लढत; पण आता स्वामी प्रसाद मौर्य उमेदवारी अर्ज घेणार मागे? कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : आरटीई प्रवेशासाठी उद्यापासून अर्ज भरता येणार

Pune News : कात्रज घाटाचा मुख्य रस्ता खचल्याने धोका; भिलारेवाडी हद्दीत सातारा रस्त्यावरील घटना

SCROLL FOR NEXT