District Rehabilitation Officer has illegally allotted land in Gaothan area of ​​Degaon. 
सोलापूर

शासकीय जागा गावकऱ्यांना बेघर करून विकण्याचा घाट

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यातील देगाव येथील गावठाण हद्दीतील भूखंडाचे बेकायदेशीर रित्या वाटप जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी केले. यात ५० वर्षापासून राहत असलेले 70 कुटुंबे बेघर होणार असून त्याची चौकशी करावी अन्यथा पंढरपूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे दिला.

याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत गट नंबर 145, 1/2/ब, 3/2/अ, 3/2 ही जमीन आहे. या जमिनीमध्ये 1965 पासून या गावातील गोरगरीब 70 कुटुंब राहत आहेत. याशिवाय समाज मंदिर व विविध देवांची मंदिरे असून या जागेत सातारा येथील कोयना पुनर्वसनच्या नावाखाली बोगस धरणग्रस्त दाखवून टाकून शासन नियमाप्रमाणे सुमारे आठ किमीच्या अंतरात जमिनी मिळालेल्या धरणग्रस्ताला रहिवाशी प्लाॅट देणे बंधनकारक आहे. परंतु  जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालय व एजंटाने मनमानी कारभार खोटी कागदपत्रे तयार करून प्लॉटची विक्री इतरांना केले. ज्या धरणग्रस्तांना प्लाॅट दिले त्यांनी त्यांच्या जमिनी यापूर्वीच विकल्या आहेत.

हा प्रकार शासन नियमाला धरून नसून गेल्या ६० वर्षापासून रहिवासी असलेल्या गावकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. सदर एजंटाकडून गावाकऱ्यांना धमकावण्याची शक्यता आहे. या प्रकाराबाबत ग्रामसभेमध्ये ठराव देखील केला. तरी देखील दुर्लक्ष करत प्लॉटची विक्री केली आहे. या गंभीर प्रकाराची आपण चौकशी करावी, अन्यथा 28 डिसेंबर रोजी ११ वाजता मंगळवेढा- पंढरपूर महामार्गावर रस्ता रोको करण्याचा इशारा दिला. ग्रामपंचायतीने देखील येथील रहिवाशांना रहिवासी उतारे दिले असे असताना पुनर्वसन कार्यालयाने अर्थपूर्ण व्यवहारातून प्लॉटची विक्रीचा सपाटा लावल्याचा आरोप येथील ग्रामस्थांतून होत आहे. शिवाय लाॅकडाऊनच्या कालावधीमध्ये सर्व शासकीय कामकाज ठप्प असताना मंगळवेढ्यात पुनर्वसनाच्या जमिनी व प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गडबड झाली असल्याची तक्रार यापूर्वीच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,व महसूल मंत्र्याकडे करण्यात आली.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT