DUDH POWEDER.jpg 
सोलापूर

उपपदार्थ निर्मिती व विक्रीसाठी बाजारपेठेतील वर्चस्व हाच दूध संकटाचा मुद्दा 

शशिकांत कडबाने

अकलूज(सोलापूर): दूध पावडरच्या किमती घसरण्याच्या कारणासोबत राज्यातील दूध संघाकडून उपपदार्थाची निर्मिती व बाजारपेठेतील स्थान भक्कम नसल्याने दूध दराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. परराज्यातील दूध संघांनी नेमके याच बाबतीत बाजारपेठेत वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामूळे दूध संघांना उपपदार्थ निर्मितीचे अर्थकारण उभे करणे ही गरज निर्माण झाली आहे. 

महाराष्ट्रातील खासगी दुध संघ मोठ्या प्रमाणावर दुध पावडर तयार करतात. लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी दुधपावडरच्या किमती 280 ते 300 रूपये होता. आता तो 150 ते 200 रूपयांपर्यंत खाली आल्या आहेत. त्यामुळे दूध पावडर बनवुन शेतकऱ्यांना दर देणे परवडत नाही. 

शासनाने दूध उत्पादकांना आधार द्यायचे काम केले. पण ती परिपुर्ण मदत नव्हती. महाराष्ट्रात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. परंतु दूध संघ पॅकिंग आणि उपपदार्थ निर्मितीमध्ये कमी पडतात. जेवढ्या प्रमाणात पुढील प्रक्रियेतून निर्माण होणारे उपपदार्थ बाजारात येऊन त्यावर अर्थकारण भक्कम होऊ शकते. त्या आधारे दूध उत्पादकाच्या दुधाला चांगला भाव मिळू शकतो. परराज्यातील दूध संघांचा पॅकिंग आणि उपपदार्थ विक्रीवर भर आहे. परराज्यांतुन आलेल्या या संघांनी महाराष्ट्रातील दूध पॅकिंग व उपपदार्थांच्या बाजारपेठा काबीज केल्या आहेत. 

सर्वाच्या विचाराने तोडगा निघावा 
शासनाने वेळीच हस्तक्षेप करून दुध उत्पादकांना न्याय देण्याचे काम करावे. दूध दर सर्वांच्या विचारातून तोडगा काढला जावा. 
- धैर्यशील मोहिते-पाटील, अध्यक्ष शिवामृत दूध संघ 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai Night Cab Viral Video : "आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं!"; पहाटे २ वाजता मुंबईत उतरलेल्या तरुणीने 'त्या' कॅबमधून प्रवास केला अन्... व्हिडिओ तुफान व्हायरल!

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : वाचा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT