Doura
Doura 
सोलापूर

काळजी करू नका सरकार तुमच्या सोबत 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगवी खुर्द व सांगवी बुद्रुक या पुलाची पाहणी केली. या वेळी शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. तुम्ही काळजी करू नका. सरकार तुमच्या सोबत आहे, असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारली. तसेच 11 शेतकऱ्यांना प्रत्येकी 95100 रुपयांचे धनादेश सुपूर्द केले. 

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी, करमाळा, माढा, सांगोला, मंगळवेढा व उत्तर सोलापूर या तालुक्‍यांमध्ये परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. तर एकाच या भागाला त्याचा मोठा फटका बसला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूरहून थेट अक्कलकोटला पोचले. सांगवी खुर्द येथील बोरी नदीवरील पुलाची पाहणी करण्यासाठी आले. मात्र शेतकऱ्यांची मागणी होती की मुख्यमंत्र्यांनी बांधावर येऊन पाहणी करावी. 

या वेळी नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. सहा दिवस झाले आमची घरे पाण्यात आहोत. अक्कलकोटच्या लोकांनी आमच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली. आमच्या गावाचं तत्काळ पुनर्वसन करा. 

तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांच्या स्वागताला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि माजी आमदार दिलीप माने हे उपस्थित होते. कोरोनामुळे उर्वरित पदाधिकाऱ्यांना विमानतळाबाहेर थांबवण्यात आले होते. 

मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT