metan foundation.jpg 
सोलापूर

डॉ. मेतन फाउंडेशनच्या वतीने "अ गाईड टू लाईफ" पुस्तकाचे प्रकाशन

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः येथील डॉ. मेतन फाउंडेशनच्या वतीने शनिवार (ता.10) डॉ. मेतन हॉस्पिटल येथे लेखक ख्यातनाम वकील ऍड. रमेश मणुरे यांनी लिहिलेल्या "अ गाईड टू लाईफ" या पुस्तकाचे प्रकाशन सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. व्यंकटेश मेतन यांनी डॉ. मेतन फाउंडेशनचे उद्देश आणि त्यांनी राबविलेल्या अनेक उपक्रमाची माहिती दिली. सोलापूरचे नावलौकिक करण्यासाठी फाउंडेशन कार्यरत असते असे सांगितले. 

लॉकडाउन दरम्यान ऍड. रमेश मणुरे यांनी वेळेचा पुरेपूर उपयोग करून आयुष्याचा अर्थ आणि त्यांनी अनुभवलेले अनेक प्रसंग या विषयाला अनुसरून हे पुस्तक इंग्रजी विषयात लिहिले. या पुस्तकात प्रामुख्याने मानवाचे आयुष्य, मानवाचे शरीर, मन, आत्मा, धर्म, मानवाचे कार्य, प्रगती, वेळ, कोरोना विषाणू, स्वतःचे जीवन आणि मृत्यू या विषयावर प्रकाश टाकलेला आहे. 
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी त्यांच्या भाषणातून हे पुस्तक प्रकाशन केल्याबद्दल डॉ. मेतन फाउंडेशनचे अभिनदंन आणि कौतुक केले. त्यांनी हे पुस्तक वाचून मानवाचा प्रवास आणि आत्मा ह्या विषयावर लिहिलेले किस्से खूप चांगल्या प्रकारे मांडल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन केले. शरीरातील प्राण हा इतर कोणत्याही महत्वाच्या अवयवांपेक्षा किती महत्वाचा आहे यावर प्रबोधन केले. मानवाचा प्रवास कसा असावा तसेच पुस्तक वाचत असताना भगवतगीता यातील काही प्रसंग नजरेसमोर येतात असे सांगितले. चिदानंद मुस्तारे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. सोमशेखर लवंगे यांनी लेखकाची ओळख करून दिली. . 
या कार्यक्रमास डॉ. बी. शिवशंकर, संदीप झवेरी, सौ. विद्या मनुरे, चिदानंद मुस्तारे, महेश बनसोडे, श्रीकांत माळगे तसेच डॉ. मेतन फाऊंडेशनचे लक्ष्मीबाई मेतन, वीणा मेतन, सोमशेखर लवंगे, सिद्धाराम सक्करगी, राघवेंद्र मेतन आणि गिरीश मेतन उपस्थित होते.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांचा पहिलाच परदेश दौरा

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT