Barshi. 
सोलापूर

महाराष्ट्राचा अपमान खपवून घेतला जाणार नाही : डॉ. सकटे यांनी दिला कंगला राणावतला इशारा 

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : मुंबई महाराष्ट्रात यावी म्हणून संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, गव्हाणकर यांनी आपल्या शाहिरीने महाराष्ट्र पिंजून काढला. 105 जणांनी बलिदान दिले. मुंबई आणि महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास आहे. असे असताना कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकिस्तानशी करू नये, असे सुनावत, महाराष्ट्राचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा दलित महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी दिला. 

दलित महासंघाच्या वतीने कोरोना योद्धा सन्मान आणि दलितमित्र गौरव पुरस्कार वितरणप्रसंगी डॉ. सकटे बोलत होते. विचारपीठावर आमदार राजेंद्र राऊत, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, नवनाथ चांदणे, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, पुष्पलता सकटे, नगरसेविका आशा लोंढे, जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे, शहराध्यक्ष संदीप आलाट, भीम टायगर संघटनेचे शंकर वाघमारे, तालुकाध्यक्ष संगीतराव शिंदे उपस्थित होते. 

कंगना राणावतला कोणीही धमकी दिली नसताना तिच्या सुरक्षेसाठी वाय प्लस सुरक्षा व्यवस्था का दिली, असा प्रश्न करून, मीडियालाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत परंतु रिया चक्रवर्ती आणि सुशांतसिंग राजपूत यांच्याशिवाय चॅनेलवर बातम्या दिसत नाहीत, अशी खंतही डॉ. सकटे यांनी व्यक्त केली. इतिहास असलेल्या महाराष्ट्राच्या मुंबईला कंगनाने शिकवू नये. अभिनय करून आपली रोजीरोटी कमवावी, बाकीच्या फंदात पडू नये, या शब्दात कंगनावर त्यांनी टीका केली. 

या वेळी आमदार राऊत यांनी अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव यांना जीवनगौरव तर शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांना अन्नदाता गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. शीतल बोपलकर, डॉ. प्रकाश लंकेश्वर, सोमनाथ झोंबाडे, श्रीमंत खराडे, सिने अभिनेत्री मयूरी देशमुख, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, ग्रामविकास अधिकारी अंकुश काटे यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला. दलितमित्र गौरव पुरस्कार पत्रकार भ. के. गव्हाणे, कांदा व्यापारी सावळा शिंदे, शरद उकिरडे, सुभाष जगदाळे, भीमाशंकर शेटे, ज्येष्ठ विधिज्ञ काकासाहेब गुंड, उल्हास जगताप, डॉ. अबोली सुलाखे, डॉ. अबिद पटेल यांना देऊन सन्मानित करण्यात आले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT