Online Land Map sakal
सोलापूर

Solapur News : घरबसल्या काढा जागेचा किंवा शेतजमिनीचा नकाशा

‘ई-नकाशा’वरून घरबसल्या काढता येईल जागेचा किंवा शेतजमिनीचा नकाशा

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - शेतात ये-जा करण्यासाठी नवा रस्ता काढायचा असल्यास किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायच्या असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा गरजेचा असतो. शेतकऱ्यांना त्यासाठी मोजणी कार्यालय किंवा सिटी सर्व्हेच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. पण, आता सरकारने सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा व जागेचा नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची व पैशांची बचत होणार आहे.

जमिनीचा नकाशा कसा पाहायचा?

१) जमिनीचा नकाशा ऑनलाइन काढण्यासाठी सर्वप्रथम गुगलवर mahabhunakasha.mahabhumi.gov.in वर सर्च करावे.

२) त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, ‘कॅटेगरी’मध्ये रुरल (ग्रामीण) आणि अर्बन (शहरी) असे दोन पर्याय दिसतील. तुमच्या सोयीनुसार पर्याय निवडावा.

३) तिसऱ्या टप्प्यावर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे आणि सगळ्यात शेवटी village map यावर क्लिक करावे. त्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात येते, त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होतो. ‘होम’ या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्हाला हा नकाशा फुल स्क्रीनमध्ये पाहता येईल.

४) त्यानंतर डावीकडील + किंवा - या बटणावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो. पुढे डावीकडे ज्या तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसतात, त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जाता येईल.

ई-नकाशा प्रकल्प नेमका आहे काय?

भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे साठवलेले असतात. त्या नकाशांद्वारे जमिनी व जागेच्या हद्दी कायम करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे हे नकाशे महत्त्वाचे असतात. पण, हे नकाशे फार वर्षांपूर्वी म्हणजेच १८८० पासूनचे आहेत. त्यामुळे त्यांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी ‘ई-नकाशा’ हा प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे.

त्याअंतर्गत तालुका स्तरावरील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील फाळणी नकाशे, भूसंपादन नकाशे, बिनशेती नकाशे ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत. या प्रकल्पामुळे डिजिटल सातबारा, ‘आठ-अ’सोबतच आता डिजिटल नकाशेही ऑनलाइन पाहता येणार आहेत.

असा काढता येईल जमिनीचा नकाशा...

नकाशाच्या पेजवर search by plot number या नावाचा रकाना असून तेथे तुमच्या सातबारावरील गट क्रमांक टाका. त्यानंतर जमिनीचा गट नकाशा ओपन होतो. ‘होम’ या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करा आणि वजाबाकीचे (-) बटण दाबून पूर्ण नकाशा पाहू शकता. त्यानंतर डावीकडे plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचे नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची माहिती दिसेल.

एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती पाहता येईल. ही माहिती पाहिल्यावर डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी map report नावाचा पर्याय असतो. त्यावर क्लिक केल्यास तुमच्या जमिनीचा plot report दिसेल. त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या (downward arrow) बाणावर क्लिक करा आणि तुम्ही नकाशा डाऊनलोड करू घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT