solapur city road repairing sakal
सोलापूर

वाहनचालकांचा थांबणार खड्ड्यांतून प्रवास! शहराअंतर्गत १७ रस्त्यांसाठी २२.६२ कोटी

महापालिकेने तब्बल १७ रस्त्यांची निविदा अंतिम केली असून त्यासाठी २२ कोटी ६२ लाख १५ हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे शहरवासियांची खड्ड्यातून कायमची मुक्तता होईल.

तात्या लांडगे

सोलापूर : पावसाळ्यापूर्वी शहराअंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने पहिल्या पावसानंतर शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. खड्ड्यातून प्रवास करताना अनेकांना त्रास सहन करावा लागत असतानाही महापालिका त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याची टीका झाली. पण, आता महापालिकेने तब्बल १७ रस्त्यांची निविदा अंतिम केली असून त्यासाठी २२ कोटी ६२ लाख १५ हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे शहरवासियांची खड्ड्यातून कायमची मुक्तता होईल.

नालेसफाई, ड्रेनेज दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे अशा कामांवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा चुराडा होऊनही पुन्हा पुन्हा तेच काम करावे लागते, अशी स्थिती आहे. डांबरीकरण केलेले रस्ते मुदतीच्या आतच उखडतात आणि पुन्हा त्याची डागडूजी करण्याची नामुष्की ओढावते. अधिकाऱ्यांनी त्यांच्या वातानुकुलित कार्यालयात बसून न राहता कामाच्या ठिकाणी वारंवार भेटी दिल्यास निश्चितपणे कामांचा दर्जा उत्तम राहतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. पण, तसे बहुतेकवेळा न झाल्याने गंभीर घटना यापूर्वी घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी केलेले रस्ते पुन्हा खड्डेमय होणे हे दुर्दैवी आहे. शहरवासियांना त्रास होऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचा सर्व्हे करून खड्डे दुरुस्तीची मोहीम हाती घेणे आवश्यक असतानाही तसे झाले नाही. त्यामुळे आता वाहनचालकांना दररोज खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय. परंतु, पुढील काही दिवसांत १७ रस्त्यांची नव्याने कामे होणार असल्याने काही वर्षे तरी वाहनचालकांना खड्ड्यांचा त्रास होणार नाही. मात्र, कोट्यवधी रुपयांची कामे सुरु झाल्यानंतर ती पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर काटेकोर वॉच ठेवल्यास कामांचा गुणवत्ता अधिक राहील, हे निश्चित.

पाऊस बंद होताच रस्त्यांची कामे

सध्या पाऊस सुरु असल्याने रस्त्यांचे डांबरीकरण सुरु केलेले नाही. ज्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे आहेत, तेथे मुरुम टाकून खड्डे बुजविले जात आहेत. १७ रस्त्यांची निविदा आता अंतिम झाली असून पाऊस उघडल्यानंतर डांबरीकरणाचे काम हाती घेतले जाईल.

- संदीप कारंजे, नगरअभियंता, सोलापूर महापालिका

निविदा अंतिम झालेले रस्ते

भाग : १

  • आसरा चौक ते डी-मार्ट (३८,३४,०७६ रुपये)

  • डी-मार्ट ते दावत हॉटेल (१,२३,९८,१९८ रुपये)

  • कुमठे रेल्वे गेट ते कुमठे गाव (६३,८६,१५१ रुपये)

  • सुंदरम नगर पाणी टाकी ते आरटीओ ऑफिस (१८,७,६४७ रुपये)

भाग : २

  • बलिदान चौक ते रुपाभवानी चौक (७४,५१,९०८ रुपये)

  • कुंभार वेस ते भवानी पेठ (४३,७४,३७४ रुपये)

  • सम्राट चौक ते बाळीवेस (४४,७२,३२० रुपये)

  • हिरामोती अपार्टमेंट ते अरिहंत स्कूल (९८,५३,७४८ रुपये)

भाग : ३

  • कुमठा नाका ते ७० फूट रोड (१,१८,७३,८८२ रुपये)

  • बेडरपूल ते जगदंबा चौक (२७,२४,४५९ रुपये)

  • जेलरोड पोलिस ठाणे ते पद्मा थिएटर (६१,८९,७०६ रुपये)

  • भारतीय चौक ते जिजामाता नागरी आरोग्य केंद्र (५४,११,३३२ रुपये)

भाग : ४

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते मेकॅनिक चौक (६२,५६,४०८ रुपये)

  • सात रस्ता ते गांधी नगर व महावीर चौक ते सावस्कर नर्सिंग होम (१,२०,२०,५९३ रुपये)

  • मोदी पोलिस चौकी ते पत्रकार भवन चौक (९५,९७,२६० रुपये)

भाग : ५

  • दयानंद कॉलेज ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (३,२२,४७,८३८ रुपये)

अरविंदधामवरुन थेट मंगळवेढा रोडला निघणार

जुना पुना नाका येथून शहरात येऊन पुन्हा भैय्या चौकातून मंगळवेढ्याला जाणारी वाहतूक आता थांबणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हायला मोठी मदत होईल. अरविंद धाम येथून आता थेट मंगळवेढा रोडला निघता येणार आहे. तो रस्ता महापालिकेने हाती घेतला असून त्याची निविदा अंतिम झाली आहे. त्यासाठी पाच कोटी ९२ लाख ५१ हजार ३२९ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT