Amravati district in the category of drought Farmers news sakal
सोलापूर

Drought News : दुष्काकाळामुळे चाऱ्याचे भाव भडकले ; पशुधन सांभाळणे झाले अवघड

Drought News : ऊस मका या पिकाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.

राजकुमार शहा

Maharashtra News : पावसाळा सुरू होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला अपवाद वगळता या कालावधीत एक ही दमदार पाऊस मोहोळ तालुक्यात झाला नाही. विशेष म्हणजे संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा चालल्याने मोहोळ तालुक्यात दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आला आहे.

उजनी डावा कालवा, आष्टी तलाव, भीमा, सिना नद्या यामुळे तालुक्यातील बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरा पासून पुन्हा कडक ऊन पडू लागल्याने आहे ह्या पाण्याचे बाष्पीभवन होत आहे, तर विहिरी व बोअरच्या पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळे ऊस मका या पिकाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. मोहोळ तालुक्यातील विविध पाणी स्तोत्रामुळे ऊस पीक मोठ्या प्रमाणात केली जाते.

मात्र, अद्यापही पाऊस न झाल्याने चालू वर्षी उसाच्या वजनात मोठी घट होणार आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. ऊस, मका, पशुखाद्य, भरडा, खापरी पेंड, यांच्या दराची व दुधाच्या दराची तुलना केली तर शेतकऱ्यांची सध्या अवस्था "हरभरे खाल्ले हात कोरडे" अशी झाली आहे. चारा विकत घेऊन जनावरे जोपासणे म्हणजे मोठी कसरत करावी लागत आहे. चाऱ्याचा दर व दुधाचा दर यांचा मेळ घातला तर हातात काही शिल्लक राहत नाही.

मोहोळ तालुक्यात तुर, मुग, उडीद, सोयाबीन या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. ही पिके फुलोऱ्यात आली आहेत. शेतकऱ्यांचा या पेरणीसाठी मोठा खर्च झाला आहे. येत्या आठवड्या भरात पाऊस न आल्यास ही पिके हातची जाणार आहेत. त्यामुळे मोठी अडचण होणार आहे.

अतुल पवार, तालुका कृषी अधिकारी, मोहोळ कोट

माझा दुग्ध व्यवसाय आहे. घरची वैरण नाही, दुधाला दर अत्यंत कमी आहे. वैरण, पशुखाद्य व मजूर याचा हिशोब घातला तर हातात "शेणा" शिवाय काहीच शिल्लक राहत नाही.

तात्या भोसल, दूध उत्पादक शेतकरी पापरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT