Ugadi pachadi 
सोलापूर

कोरोना : सोलापुरातील पारंपरिक "उगादी पंडुगा'वर परिणाम

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : येथील पूर्वभागात पूर्वापार चालत आलेल्या आंध्र प्रदेशातील प्रथा-परंपरेनुसार अनेक सण उत्साहाने साजरे केले जातात. गुढीपाडवा हा सण आंध्रातील परंपरेनुसार "उगादी पंडुगा' म्हणून येथे साजरा केला जातो. मात्र कोरोना विषाणूच्या रुद्रावतारामुळे देशावर संकट आले आहे. देवालयेच बंद ठेवण्यात आल्याने बुधवारी (ता. 25) साजरा होणाऱ्या उगादी पंडुगावर त्याचा परिणाम जाणवणार आहे.

"श्रीं'चे दर्शन व प्रसादाला मुकावे लागणार
कोरोनामुळे देशभरातील मोठी मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. काही मंदिरांमध्ये रोजची पूजाअर्चा तेवढी सुरू आहे. त्याच धर्तीवर सोलापुरातील मंदिरेही बंद ठेवून पुजाऱ्यांमार्फत नित्य पूजाविधी सुरू आहेत. गुढी पाडव्यानिमित्त मंदिरांमध्ये फक्त पुरोहितांच्या उपस्थितीत "श्रीं'चा अभिषेक होणार असून, भाविकांना दर्शन व प्रसादाला मुकावे लागणार आहे. तसेच दरवर्षी पूर्व भागातील भावनाऋषी पेठेतील पंचमुखी हनुमान देवस्थानम्‌ येथे सामूहिक पच्चेडी सेवनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. हा कार्यक्रमही आता सामूहिकरीत्या न करता पुरोहितांच्या उपस्थितीत मर्यादित स्वरूपात व साधेपणाने केला जाणार आहे.

"गेट टुगेदर'वर होणार नाही
या वर्षी कोरोनामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जमावबंदीचा आदेश लागू झाला आहे. त्यामुळे मंदिरे दर्शनासाठी बंद केल्याने भाविकांना गुढी पाडव्यादिवशी अभिषेक व प्रसादापासून वंचित राहावे लागणार आहे. तसेच नागरिक नवीन वस्त्रे परिधान करून भगव्या ध्वजाचे पूजन करतात. नवीन जावई, सून, नातू व नातवंडांना साखरेचे व खोबऱ्याचे हार घालतात. मात्र या वर्षी नातेवाइकांच्या "गेट टुगेदर'वरही परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी पंचमुखी देवस्थानने सामूहिक पच्चडी सेवनाचा व पंचांग श्रवणाचा कार्यक्रम रद्द केला असून, पुरोहितामार्फत धार्मिक विधी होणार आहेत.
- सत्यनारायण गुर्रम, सचिव, पंचमुखी देवस्थान

दाजी पेठ येथील वेंकटेश्‍वर मंदिरात दरवर्षी गुढी पाडव्याला भाविकांतर्फे अभिषेक होतात व प्रसादाचे वाटपही केले जातात. या वर्षी मात्र भाविकांशिवाय पुरोहितामार्फत धार्मिक विधी होणार आहेत.
- श्री. रापेल्ली, व्यवस्थापक, श्री वेंकटेश्‍वर देवस्थानम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News :ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT