Solapur 
सोलापूर

कोरोना : मुंबई, पुणे, नागपूरनंतर सोलापूर शहरात मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोना विषाणूच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अत्यावश्‍यक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला. मुंबई, पुणे व नागपूरनंतर सोलापूर शहरासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतरही आज सायंकाळी शहरातील व्यापारी, विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवली तर काही ठिकाणी सायंकाळी सहानंतरही आदेशाला न जुमानता दुकाने सुरू असल्याचे दिसून आले.

पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला शुक्रवारी पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील आठवडे बाजार, जनावरांचा बाजार, मॉल्स, सोने-चांदी, कापड, ऑटोमोबाईल, भांडी, इलेक्‍ट्रिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, प्लायवूड विक्री आणि इतर दुकाने आज सायंकाळी सहापासून 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र विजापूर वेस येथील निम्मी दुकाने बंद तर निम्मे कपड्यांचे शोरूम, ज्वेलर्स, चहा कॅंटीन आदी दुकाने सुरू होते. त्याचप्रमाणे गर्दी कमी होण्याऐवजी रात्री गर्दी कायम होती. शुक्रवार पेठ व शहरातील अशी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन पोलिस करत होते. माणिक चौक परिसरातील काही दुकाने बंद होती तर मधला मारुती परिसरातील फुलांची दुकाने, मिठाईची दुकाने सुरू होती. भांडी गल्लीतील बहुतांश भांड्यांची दुकाने सुरू होती. सराफ कट्टा येथील सोने-चांदीची दुकानेही सायंकाळी बंद ठेवण्यात आली होती. चाटी गल्ली, कुंभार वेस येथील अनेक गर्दीची दुकाने सायंकाळी सहा वाजता बंद केली जात होती. शहरातील सर्वच चहा व कोल्ड्रिंक्‍सची दुकाने बंद झाली. नवी पेठ व मोबाईल गल्लीतील सर्वच दुकाने बंद झाल्याने सायंकाळनंतर परिसरात शुकशुकाट जाणवत होता. अशीच परिस्थिती शहरातील इतर ठिकाणी दिसून आली. मात्र पेट्रोल पंपांवर वाहनांची गर्दी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचाही तडाखा बसणार, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

शरण आलेल्या माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, कौटुंबिक आयुष्य सुखकर होणार

युद्ध थांबणं कठीण! इराणच्या अटी ठरू शकतात अडथळा, होर्मुझ टोल ते लष्करी तळ; अमेरिकेसमोर काय अटी?

Surat Station Redevelopment: A Boost for Mumbai-Gujarat Connectivity : मुंबई-सुरत लोकल सेवा सुरू होणार? सुरत स्टेशनवर सुरू असलेल्या 'या' कामांमुळे चर्चेला उधाण.

NRAI Demands Immediate Restoration of Commercial LPG Supply : एमएनजीएल (MNGL) पाईपलाईन आता वेगाने धावणार? हॉटेल उद्योगासाठी मोठी बातमी.

SCROLL FOR NEXT