Due to Corona, this year's Thirty First will not see a party and a DJ in the city 
सोलापूर

रात्रीच्या कर्फ्यूमुळे 'थर्टी फर्स्ट'च्या सेलिब्रेशनवर पाणी ! ग्रामीण भागात मात्र जोरदार तयारी ; शेतात पार्ट्यांचे बेत

अमोल व्यवहारे

सोलापूर : रात्रीच्या संचारबंदीच्या निर्णयामुळे नववर्ष प्रारंभादरम्यानच्या कालावधीत होणाऱ्या आनंदावर शहरवासियांना पाणी सोडावे लागणार आहे. मात्र, ग्रामीण भागात थर्टी फस्टचे जंगी स्वागत होण्याच्या शक्‍यतेने ग्रामीण भागातील शेतात, हॉटेल्स, ढाबे तयारी करीत असून यांवरही प्रशासनाकडून करडी नजर ठेवण्यात येत आहे. हे सेलिब्रेशन करताना संपूर्ण रात्र ही तरूणाईला शहराबाहेरच काढावी लागणार, नाही तर शहर पोलिसांचा दंडुका किंवा कारवाईला सामोरे जावे लागणार, हे मात्र नक्‍की. 

थर्टी फस्टची नाईट म्हणजे तरूणाईसाठी आनंदाचा, पार्टी करण्याचा क्षण. परंतु, ब्रिटनमध्ये मिळून आलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सध्या राज्य सरकारने महापालिका क्षेत्रांमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रात्री 11 ते सकाळी 6 या कालावधीसाठी संचारबंदी घोषित केली आहे. त्याची अंमलबजावणी सध्या पोलिस प्रशासनाकडून जोरदारपणे करण्यात येत आहे. हा आदेश 5 जानेवारीपर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे यंदाच्या थर्टी फस्टला शहरात मद्यधुंद पार्ट्या, खणखणीत वाजणारा डीजे हे दृश्‍य यंदा दिसणारच नाही. त्याचा फटका शहरातील हॉटेल व्यावसायिक, रेस्टॉरंट व बारचालकांना बसणार आहे. 

मात्र, सोलापूर शहराला जोडणाऱ्या पुणे, हैदराबाद, तुळजापूर आणि विजापूर महामार्गावरील हॉटेल्स, ढाबे आणि रेस्टॉरंटमध्ये मद्यधुंद पार्ट्या, खणखणीत डीजे हे दृश्‍य दिसणार. तर शहराच्या आजूबाजूस ज्यांची शेती आहे, अशांनी तर त्यांच्या शेतातच पार्ट्यांचा बेत आखायला सुरुवात केली आहे. त्यासाठीची तयारीही सुरु केल्याचे चित्र दिसत आहे.

सोलापूरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

सरकारच्या संचारबंदीच्या निर्णयामुळे मात्र शहरात रात्री शुकशुकाट तर ग्रामीण भागात रेलचेल दिसणार आहे. सोलापुरातील तरुण मंडळी आतापासूनच 31 डिसेंबरसाठी हायवेवरील हॉटेलमध्ये टेबल बुक करण्याच्या नादाला लागला आहे. कोरोना संकटामुळे वर्क फ्रॉम होम करणारी आयटी इंडस्ट्रीतली तरुणाई सध्या थर्टीफर्स्टचा बेत आखण्यात दंग आहे. ग्रामीण भागात सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत हे सेलिब्रेशन झाल्यानंतर रात्री घरी परतण्याचा विचार मात्र तरुणाईला सोडून द्यावा लागणार असून सूर्योदयानंतर शहरात पुन्हा प्रवेश करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : मराठवाड्यात किती नगराध्यक्ष, किती नगरसेवक निवडून येणार? एका क्लिकवर वाचा

Lionel Messi India Visit : लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याने फुटबॉलप्रेमींना दिली प्रेरणादायी ऊर्जा

Suryakumar Yadav Cricket Stats : हे ‘सूर्यग्रहण’ सुटायला हवे!

साप्ताहिक राशिभविष्य : २१ डिसेंबर २०२५ ते २७ डिसेंबर २०२५

Morning Breakfast Recipe: Fit राहायचंय? मग सकाळी नाश्त्यात बनवा ज्वारीच्या पीठापासून मस्त नाश्ता, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT