DOCTOR.jpg 
सोलापूर

पंढरपूर शहरात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे इतर आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष ;कोणी मांडला प्रश्न ? ते वाचा

भारत नागणे

पंढरपूर(सोलापूर)ः पंढरपूर परिसरात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा तीनशेवर पोहोचल्याने उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. इतर आजाराच्या रुग्णांकडे (कोमॉर्बिड) व संशयित रुग्णांच्या संदर्भात स्वतंत्र वार्ड करणे आवश्‍यक झाले आहे. इतर आजाराचे रुग्ण व आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी स्वतंत्र वार्ड हाच पर्याय वापरणे महत्वाचे झाले आहे. 

शहरात व तालुक्‍यात कोरोना रुग्ण संख्या तीनशेच्या वर गेली आहे. कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यु झाला आहे. कोरोना संसर्ग साथीमुळे इतर आजार असलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याचे अनेक प्रकार समोर येवून लागले आहेत. खासगी रुग्णालयात देखील इतर आजाराच्या रुग्णांवर वेळेत उपचार केले जात नाहीत. इतर आजारांसाठी शासकीय व खासगी रुग्णालयात स्वतंत्र सोय उपलब्ध करुन देणे आवश्‍यक झाले आहे. योग्य उपचार मिळाले तर या रुग्णांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. 

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे या काळात सर्दी, ताप, खोकल्याचे आजारही वाढत आहेत. हे रुग्ण कोरोना आजाराचे नसले तरी लक्षणे सारखी असल्याने त्यांना रुग्णांना स्वतंत्र ठिकाणी उपचार सुरु करावेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. 

उपाययोजना कराव्यात 
शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने संशयित व कोमॉरबीड (इतर आजार व कोरोना असलेले रुग्ण) रुग्णासाठी स्वतंत्र आयसोलेशन वार्ड सुरु करावेत 
- विवेक परदेशी, सभापती आरोग्य समिती नगरपालिका पंढरपूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा हायवेवर महाकोंडी! ३ तासांच्या प्रवासाला १२ तास, एसटीतील प्रवाशांचा संताप

पावसाने रोखला गणेशभक्तांचा मार्ग! शनिवारच्या रात्रीत ६ हजार वाहनांचा प्रवास; रविवारी राहणार सर्वाधिक रहदारी

Sangli Ganpati: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! बबलूनंतर आसाममधून येणार नवा हत्ती; गणपती संस्थानचा वैभवशाली थाट कायम राहणार

Marathi News Live Updates : पेपरफुटीला कायमचा आळा घालण्यासाठी झिरो लीक सिस्टीम; परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल, ऐनवेळी प्रश्नपत्रिका तयार करून ऑनलाइन वितरणाचा प्रस्ताव

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT