Pigmy agent 
सोलापूर

अरेच्चा..! दिवसभर भटकंती करूनही का राहतेय "यांची' बॅग रिकामी? 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : शहरातील बाजारपेठांत 10 ते 12 तास उन्हातान्हात फिरून पैसे गोळा करून बॅंकांत जमा करणारा, बॅंका व ग्राहकांत दुवा म्हणून काम करणारा व मिळणाऱ्या कमिशनवर उदरनिर्वाह करणारे पिग्मी एजंट लॉकडाउनने बेरोजगार झाले होते. आता लॉकडाउननंतर दिवसभर भटकंती करून अपेक्षित वसुली होत नसल्याने बेजार झाले आहेत. 

लॉकडाउन शिथिल झाल्यापासून बाजारपेठांतील दुकाने सुरू झाली आहेत. मात्र, एकदिवसाआड दुकाने सुरू होत असल्याने, सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळाल्याने व ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद नसल्याने बाजारपेठांत म्हणावा तसा पैसा अजूनही फिरत नाही. लॉकडाउनमध्ये महत्त्वाचे सण, लग्नसराई असा ऐन सीझन काळ गेल्याने लॉकडाउननंतर दोन-अडीच महिन्यांनी दुकाने सुरू होऊनही अनेक व्यापारी, दुकानदार ग्राहकांची वाट पाहात आहेत. त्यात कामगारांचा पगार, नवीन गुंतवणूक करण्यासाठी व्यापारी व दुकानदारांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे पिग्मी भरून बचत करण्याएवढा व्यवसाय होईल तेव्हा पिग्मी भरू, असे व्यावसायिक व दुकानदारांकडून आलेल्या पिग्मी एजंटांना सांगितले जात आहे. आर्थिक चक्र लगेच सुरळीत होण्याची चिन्हे दिसत नसल्याने आणखी किती महिने उपासमार घडणार, याची चिंता पिग्मी एजंटांना लागली आहे. 

बॅंकेसंबंधी कामे करूनही आम्हाला कर्मचारी म्हणून मान्यता नाही. ईपीएफ, ईएसआय, बोनस, हक्करजा अशा कोणत्याही सामाजिक सुरक्षा नाहीत. थंडी, ऊन, वारा व पाऊस झेलत ज्या दिवशी 10-12 तास, 30 ते 35 किलोमीटर फिरून रक्कम वसुली केली, त्याच दिवशी अडीच ते तीन टक्के कमिशन मिळते. मात्र, लॉकडाउनने वसुली बंद झाली. आता लॉकडाउननंतर दुकाने सुरू झाली तरी दोन-अडीच हजारांचीच वसुली होत आहे. आणखी सहा महिने अशीच परिस्थिती राहण्याची चिन्हे आहेत. आम्हाला पर्यायी दुसरा व्यवसाय, उद्योग नसल्याने सरकारने निदान पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करावी. 
- किशोर बुलबुले, 
पिग्मी एजंट 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

Latest Marathi News Update : वाशिम-कारंजा मार्गावर CNG गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सिलेंडरचा स्फोट; जीवितहानी टळली

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT