Milk Agitation
Milk Agitation 
सोलापूर

दूध दरवाढ आंदोलनामुळे "या' तालुक्‍यातील सव्वा दोन लाख लिटर दुधाचे संकलन थांबले 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुधाला ज्यादा दर मिळावा व दूध भुकटीची आयात थांबवावी या इतर मागण्यांसाठी राज्यभर करण्यात आलेल्या आंदोलनामुळे तालुक्‍यातील जवळपास सव्वा दोन लाख लिटर दुधाचे संकलन थांबले. मंगळवारी सकाळी बहुतांश गावातील ग्रामदैवतांना दुधाचा अभिषेक घालून या आंदोलनाची सुरवात करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष राहुल घुले, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, शंकर संघशेट्टी, अनिल बिराजदार, आबा खांडेकर, श्रीकांत पाटील, रोहित भोसले यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. 

दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या मंगळवेढा तालुक्‍यात अलीकडच्या काळामध्ये शेतीला पर्यायी रोजगार म्हणून दूध व्यवसायात शेतकऱ्यांनी लक्ष घातले त्यामध्ये नेचर, सह्याद्री, सोनई, हॅटसन, माणगंगा, पारस, जिल्हा दूध संघ यासह अन्य खासगी व सहकारी दूध संस्थांच्या माध्यमातून तालुक्‍यातून जवळपास सव्वा दोन लाखाच्या आसपास दुधाचे संकलन केले जाते. परंतु दुधाला 20 रुपये दर असल्यामुळे सध्या पशुखाद्याच्या दरापेक्षा दुधाचा दर कमी आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. त्यांच्या मागण्यांमध्ये केंद्र सरकारने 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, 30 हजार टन दूध पावडर बफर स्टॉक निश्‍चित करून निर्यातीला अनुसरून प्रतिकिलो 30 रुपये देण्यात यावे, दूध पावडर, तूप, बटर या दुग्धजन्य पदार्थांवर आकारली जाणारी जीएसटी रद्द करण्यात यावी, गाईच्या दुधाला प्रतिलिटर दर 25 रुपये व पाच रुपये अनुदान द्यावे या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. तालुक्‍यामध्ये माचणूर, ब्रह्मपुरी, सिद्धापूर, बोराळे, नंदूर, डोणज, मरवडे, तळसंगी, भाळवणी, भोसे, नंदेश्वर, गोणेवाडी, लक्ष्मी दहीवडी, आंधळगाव, डोंगरगाव, खोमनाळ, हाजापूर, जालीहाळ, सलगर बुद्रूक, लवंगी, मारोळी, शिरनांदगी, मानेवाडी, शिरशी, पाटकळ, जुनोनी, खडकी, लेंडवे चिंचाळे, मारापूर, लोणार, पडोळकरवाडी, जित्ती, जंगलगी, चिक्कलगी, बठाण, उचेठाण या भागातील शेतकऱ्यांचे दूध संकलन थांबल्यामुळे काही शेतकऱ्यांनी दुधाचा उपयोग घरीच पेढा व बासुंदी करण्यासाठी केला. 

या दूध संघांचे इतके दूध संकलन थांबले 
नेचर डिलाईट 32 हजार लिटर, चितळे दूध डेअरी 30 हजार, हॅटसन दूध 60 हजार लिटर, सह्याद्री दूध 15 हजार लिटर, सोनाई दूध 70 हजार लिटर, जिल्हा दूध संघ 20 हजार लिटर, पारस 18 हजार, माणगंगा दोन हजार 

दूध उत्पादक शेतकरी गणपती केळकर म्हणाले, सध्या पशुखाद्याचे वाढलेले दर विचारात घेता दुधाला मिळणारा दर हा अतिशय कमी आहे. त्यामुळे दूध व्यवसाय करणे अडचणीचे होत आहे. शासनाने दुधाच्या दरात वाढ केली तरच दूध उत्पादक टिकणार आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार म्हणाले, तालुक्‍यामध्ये शेतीबरोबर दूध व्यवसाय टिकून आहे सध्या उत्पादकाचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न सुरू आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या मागण्यांकडे शासनाने दखल घ्यावी भविष्यातही आंदोलनाच्या माध्यमातून लढा केला जाईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: लॉकी फर्ग्युसनने तोडली रचिन-रहाणेची पार्टनरशीप, चेन्नईला तिसरा धक्का

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT