थेट विक्रीमुळे शेटफळचा पेरू खातोय दिल्ली बाजारपेठेत भाव!
थेट विक्रीमुळे शेटफळचा पेरू खातोय दिल्ली बाजारपेठेत भाव! Canva
सोलापूर

थेट विक्रीमुळे शेटफळचा पेरू खातोय दिल्ली बाजारपेठेत भाव!

गजेंद्र पोळ

गेल्या वर्षी दरात मोठी घसरण झाल्याने बागा मोडून टाकाव्या या निर्णयापर्यंत शेतकरी आले होते.

चिखलठाण (सोलापूर) : शेटफळ (Shetphal) (ता. करमाळा) (Karmala) येथील शेतकऱ्यांचा पेरू (Guava) दिल्लीच्या बाजारपेठेत चांगलाच भाव खात असून, गटशेतीच्या (Group farming) माध्यमातून घेत असलेल्या या पिकाला किसान रेल्वे (Kisan Rail) सुविधेमुळे दिल्ली बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा थेट फायदा होत आहे. शेटफळ (ता. करमाळा) येथील तरुण शेतकरी गेल्या पाच वर्षांपासून नागनाथ शेतकरी गट व लोकविकास फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून केळी व पेरूचे पीक घेत आहेत. (Due to direct sales, Guava in Shetphal has reached the Delhi market-ssd73)

निर्यातक्षम केळीबरोबरच काही शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर प्रगतशील शेतकरी विजय लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हीएनआर जातींच्या पेरूची लागवड केली असून, सध्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी तीस एकर क्षेत्रावर हे पीक घेतले आहे. किसान रेल्वे सुविधेमुळे थेट दिल्ली बाजारपेठेत मार्केटिंग होत असल्याने गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. गट शेतीच्या माध्यमातून येथील विजय लबडे नानासाहेब साळुंके, महावीर निंबाळकर, हरिश्‍चंद्र शेळके यांनी आपल्या शेतात सुरवातीला व्हीएनआर पेरूची लागवड केली. पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातील उत्कृष्ट पेरू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देऊन या पिकातील बारकावे समजून घेतले. एकरी पंधरा ते सतरा टनांपर्यंत उत्पादन घेतले; परंतु पुणे, मुंबई, हैदराबाद या बाजारपेठेत चांगला दर मिळत नव्हता. गेल्या वर्षी दरात मोठी घसरण झाल्याने या बागा मोडून टाकाव्या या निर्णयापर्यंत ते आले होते. परंतु किसान रेल्वे सुविधेमुळे दिल्ली बाजारपेठेत पंचवीस ते तीस तासांच्या कालावधीत माल पोच होत असल्याने व मालाचा दर्जा चांगला असल्याने दरही चांगला मिळू लागला आहे.

पेरूचे उत्तम प्रकारे ग्रेडिंग, पॅकिंग व दहा किलो वजनाच्या बॉक्‍समध्ये शेतकरी उत्पादक कंपनीच्या नावाने ब्रॅंडिंग करून माल दिल्ली बाजारपेठेत जात असल्याने दिल्ली बाजारपेठेत नवी ओळख निर्माण झाली आहे. दिल्लीच्या व्यापाऱ्यांकडून आवर्जून या पेरूची मागणी केली जात आहे. याचा फायदा गटातील इतर छोट्या शेतकऱ्यांना होत आहे. रेल्वे विभागाकडून किसान रेल्वे सुविधा सुरू झाल्यामुळे वाहतूक खर्चात मोठी बचत झाली. कृषिरत्न आनंद कोठडिया यांच्या मार्गदर्शनाखाली कंदर येथील के. डी. एक्‍स्पोर्टचे किरण डोके यांच्या सहकार्याने दिल्ली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी थेट लिंक जुळल्याने शेतकऱ्यांचा माल पाठवणे शक्‍य झाले. यामुळे स्थानिक बाजारपेठेपेक्षा दुप्पट दर मिळून शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे.

गटशेतीच्या माध्यमातून पेरू पीक निवडले. भरघोस उत्पादन घेण्यात यशस्वी झालो. परंतु सुरवातीला बाजारपेठेची अडचण होती. किसान रेल्वे सुविधेमुळे ती दूर झाली आहे. शेटफळ परिसरातील शेतकऱ्यांचा माल जेऊर येथून दिल्लीला पाठवला जात होता; परंतु रेल्वेने जेऊर येथील लोडिंग बंद केल्यामुळे कुर्डुवाडी येथे माल घेऊन जावा लागत आहे. जेऊर येथील सुविधा पूर्ववत सुरू करणे गरजेचे आहे.

- विजय लबडे, पेरू उत्पादक शेतकरी, शेटफळ

कोणतेही पीक जर एका शेतकऱ्याने केले तर त्याला मार्केटिंगची अडचण येते. गटशेतीच्या माध्यमातून मार्केटिंग व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी फायदा होतो. पेरू पिकाबाबत आम्हाला काही माहिती नव्हती; परंतु आमच्या गटातील प्रगतशील शेतकरी विजय लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही सर्व शेतकरी नियोजन करतो. याचा फायदा आम्हा सर्व शेतकऱ्यांना होत आहे.

- नानासाहेब साळुंके, पेरू उत्पादक शेतकरी, शेटफळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT