कोरोनाची भीती गेली; उलाढाल वाढली! दहा टक्के व्यवसायवृद्धी Sakal
सोलापूर

कोरोनाची भीती गेली; उलाढाल वाढली! दहा टक्के व्यवसायवृद्धी

कोरोनाची भीती गेली; उलाढाल वाढली! दहा टक्के व्यवसायवृद्धी

सकाळ वृत्तसेवा

विजयादशमीला मोठ्या प्रमाणात झालेल्या उलाढालीनंतर आता दिवाळीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) दोन लाटांना तोंड दिलेला ग्राहक तिसरी लाट येते की काय, या भीतीखाली वावरत होता. लसीकरणाचा (Vaccination) सकारात्मक परिणाम होऊन सध्या बाजारपेठेत उलाढाल वाढली आहे. विजयादशमीला (Vijayadashmi) मोठ्या प्रमाणात झालेल्या उलाढालीनंतर आता दिवाळीसाठी (Diwali) बाजारपेठ सज्ज झाली आहे. ऍटोमोबाइल, इलेक्‍ट्रॉनिक, बांधकाम व सोने- चांदीसह (Gold) इतर बाजारपेठेत यंदा दरवर्षीपेक्षा अंदाजे दहा टक्के व्यवसायवृद्धी होत असून यंदाच्या दिवाळीत चांगली उलाढाल होईल, असा विश्‍वास शहरातील विविध व्यापारी संघटनांच्या अध्यक्षांनी व्यक्त केला. 'कॉफी विथ सकाळ' (Coffee With Sakal) मध्ये शहरातील विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी बोलत होते. यावेळी सोलापूर ऍटोमोबाईल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष पृथ्वीराज गांधी यांचे स्वागत 'सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी (Abhay Diwanji) यांनी केले.

कोरोनामुळे वाढली चारचाकीची क्रेझ

कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणे कठीण झाल्याने चारचाकी वाहन घेण्याकडे सर्वसामान्यांचाही कल वाढला आहे. चारचाकी गाडी ही आता गरजेची झाली आहे. तसेच घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या आवड व सोयीनुसार स्वतंत्र वाहन अशी क्रेझ निर्माण झाली आहे. यामुळे वाहन विक्री उद्योगात कोरोनानंतर सध्या उलाढाल वाढत आहे. यंदा सोलापूरमध्ये दहा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक व्यवसायवृद्धी आहे. अनेक गाड्यांसाठी वेंटिग आहे. मागील काही दिवसांपासून वाहन नोंदणी करण्याची जबाबदारी विक्रेत्यांकडे सोपविण्यात आली आहे. याचा फायदा ग्राहकांना झाला असून अनेक चकरा माराव्या लागणारे काम आता चुटकीसरशी होत आहे. म्यॅन्युफॅक्‍चरिंग कॉस्ट वाढल्याने सुमारे तीस ते चाळीस टक्के किंमत वाढ झाली आहे. तरीदेखील नव्या तंत्रज्ञानानुसार अद्ययावत वाहनांना मागणी आहे. सुरक्षितता वाढवणारी वेगवेगळी फीचर्स असणारी वाहने बाजारात येत आहेत. ग्राहक त्याकडे आकर्षित होत आहे.

- पृथ्वीराज गांधी, अध्यक्ष, सोलापूर ऍटोमोबाईल डीलर असोसिएशन

इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू खरेदीत यंदा ग्राहकांची "दिवाळी'

इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू खरेदीत यंदा ग्राहकांची दिवाळी आहे. कोरोना पूर्वी इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. चीनची आयात बंद करण्यात आल्याने अनेक सुटे भागांचे शॉर्टेज आहे. त्यामुळे प्रॉडॅक्‍शन लिमिटेड आहे. तरी देखील सर्वच कंपन्यांनी ग्राहकांसाठी कॅश बॅकसह अनेक ऑफर देऊ केल्या आहेत. त्यामुळे यंदा ग्राहकांची दिवाळी आहे. मागील अनेक दिवस कोरोनाचे निर्बंध होते. सध्या निर्बंध उठल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. सोलापूर शहरात ऑनलाइनपेक्षा ऑफलाइनकडे ग्राहकांचा कल जास्त आहे. ग्राहकांना ऑफलाइनमध्ये वस्तू प्रत्यक्ष पाहता येते. हाताळता येते. विक्रीनंतरच्या सेवासुविधा मिळतात. मुळात इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंबाबत ऑनलाइनपेक्षा ऑफलाइनची विश्‍वासार्हता असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदीला पसंती दिली जाते. सध्या मोबाइल- लॅपटॉप, वॉशिंग मशिन व एलईडी टीव्हीची मागणी अधिक आहे.

- ईश्‍वर मालू, अध्यक्ष, सोलापूर इलेक्‍ट्रॉनिक्‍स डीलर असोसिएशन

रेडी पजेशन घर खरेदीची हीच आहे योग्य वेळ

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर डिसेंबर 2020 पासून शासनाने निर्बंध शिथिल करताच बांधकाम क्षेत्रानेही उभारी घ्यायला सुरवात केली होती. मार्च 2021 पर्यंत शहर- जिल्ह्यात फ्लॅट, रो-हाऊस व बंगलो बुकिंग होत होते. सर्व सुरळीत होत असतानाच दुसरी लाट आली आणि पुन्हा सर्वकाही ठप्प झाले. आता मात्र दुसरी लाट ओसल्यावर कोरोना अन्‌ निर्बंधांपासून मुक्ती मिळाल्याने ग्राहक "स्वप्नातील घरां'साठी सरसावले आहेत. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात घरांची बुकिंग झाली. आता दिवाळीच्या मुहूर्तावरदेखील घर खरेदीसाठी बुकिंग मोठ्या प्रमाणात होत आहे. दुसरीकडे, मागील 25 वर्षात कधी झाली नव्हती एवढी कन्स्ट्रक्‍शन कॉस्ट, लेबर चार्जेस वाढले आहेत. परिणामी नव्याने बांधण्यात येणाऱ्या घरांच्या किंमती 30 ते 35 टक्‍क्‍यांनी महागणार आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत रेडी पजेशन असलेली घरे (फ्लॅट, रो-हाऊस, बंगलो) खरेदी केल्यास ग्राहकांचे बजेट नक्कीच वाचणार आहे.

- शशिकांत जिड्डीमनी, अध्यक्ष, क्रेडाई, सोलापूर

कोरोनानंतर पुन्हा बाजारपेठ सज्ज

कोरोनानंतर यावर्षी दसरा- दिवाळीची बाजारपेठ पूर्ण क्षमतेने उघडली आहे. त्यातच सोन्याचे भाव मागील काही महिन्यात पन्नास हजारांपेक्षाही कमी झाले आहेत. त्याचा लाभ गुंतवणूकदारांना चांगला मिळाला आहे. भाव उतरण्याचा हा कालावधी काही महिने होता, याचा पुरेपूर उपयोग खरेदीसाठी केला गेला आहे. यावर्षी दसरा- दिवाळीनंतर लगेचच लग्नसराई सुरू होत आहे. त्यामुळे बाजारात सोने- चांदी खरेदीची वाढ फार मोठी आहे. याच वर्षी सोन्याच्या दागिन्याला हॉलमार्कचे गुणवत्ता मानांकन सक्तीचे झाले. हॉलमार्कच्या दागिन्यांची खरेदी कुठेही केली तरी या दागिन्यांवर मिळणारे कर्ज, रिसेल आदी व्यवहार चांगल्या पद्धतीने केले जातील. उत्तम गुणवत्तापूर्ण सेवा देणाऱ्या व्यापाऱ्यांना या मानांकनाचा आधारच झाला आहे. बाजारपेठ एक मोठ्या चांगल्या बदलाला सामोरे गेली आहे.

- सिद्धाराम शिंगारे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन

ऑनलाइनऐवजी ऑफलाइन, स्थानिक व्यापाऱ्याकडून करा खरेदी

कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांनी ग्राहकांना शासनाच्या नियमांचे पालन करत ऑनलाइन पद्धतीने तसेच घरपोच सेवा दिली. या काळात दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. तरीही व्यापाऱ्यांनी घरपोच सेवा दिली. कोरोनानंतर आता बाजारपेठ पुन्हा सज्ज झाली आहे. नवी पेठमधील व्यापाऱ्यांनी ग्राहकांच्या पसंत पडतील अशा अनेक प्रकारच्या व्हरायटी उपलब्ध केल्या आहेत. ग्राहकांनी ऑनलाइनऐवजी स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदीवर भर द्यावा. ऑनलाइन खरेदीत अनेकदा रंग, साइज व गुणवत्ता यात फसवणूक होण्याची शक्‍यता आहे. मात्र, स्थानिक व्यापाऱ्यांकडून आपण स्वत: पाहून खात्रीपूर्वक खरेदी करू शकता. यामुळे ग्राहकांनी स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करावी.

- अशोक मुळीक, अध्यक्ष, नवी पेठ व्यापारी असोसिएशन, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकांकडून छळ… दिल्ली मेट्रो प्लॅटफॉर्मवरून उडी मारत जीवन संपवलं! शेवटचं वाक्य अंगावर काटा आणणारं

Latest Marathi News Update LIVE: पुण्यात सलग तीन दिवस १० अंशांखाली तापमान

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Amravati Crime: अमरावती हादरली! युवकाची पूर्ववैमनस्यातून हत्या

Bicycle Riding: 'सोलापूरच्या चौघांनी के२के सायकल रायडिंगमध्ये रचला इतिहास'; काश्मीर ते कन्याकुमारी १६ दिवसांमध्ये ४२०० किमी प्रवास पूर्ण..

SCROLL FOR NEXT