किसान रेल्वे Canva
सोलापूर

मोठ्या प्रतिसादामुळे किसान रेल्वे धावणार आता आठवड्यातील चार दिवस !

मोठ्या प्रतिसादामुळे किसान रेल्वे धावणार आता आठवड्यातील चार दिवस !

विजय थोरात

शेतकरी आणि व्यापऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने ही एक्‍स्प्रेस आता आठवड्यातील चार दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

सोलापूर : रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य मार्केट मिळावे, शेतकऱ्यांचा शेतीमाल विविध ठिकाणी पोचला जावा, या विचाराने किसान रेल्वे (Kisan Railway) सुरू केली आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे देशातील विविध भागात वितरण झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना देशातील विविध ठिकाणी शेतीमाल पोचता होत असल्याने त्यांचा आर्थिक विकासही होत आहे. किसान रेल्वे पार्सल एक्‍स्प्रेस सध्या आठवड्यातील तीन दिवस धावत आहे. शेतकरी आणि व्यापऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने ही एक्‍स्प्रेस आता आठवड्यातील चार दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 9 ऑगस्टपासून हा नवीन बदल अस्तित्वात येणार असल्याची माहिती रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे (Pradeep Hirade, Solapur) यांनी दिली.

गाडी क्रमांक 00107 देवळाली- मुजफ्फरपूर किसान रेल्वे एक्‍स्प्रेस ही आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी, शनिवारी धावत होती. ही गाडी 9 ऑगस्टपासून आठवड्यातील प्रत्येक सोमवारी, मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी धावणार आहे. गाडी क्रमांक 00108 मुजफ्फरपूर - मनमाड किसान रेल्वे क्‍स्प्रेस ही आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी, शनिवारी आणि सोमवारी धावत होती. ही गाडी आता आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी, शनिवारी, सोमवारी आणि बुधवारी धावणार आहे. गाडी क्रमांक 00109 सांगोला- मनमाड किसान रेल्वे क्‍स्प्रेस ही आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी धावत होती, ती आता आठवड्यातील प्रत्येक सोमवारी, मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी धावणार आहे. गाडी क्रमांक 00110 मनमाड- दौंड किसान रेल्वे क्‍स्प्रेस ही आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी आणि रविवारी धावत होती, ती आता प्रत्येक शुक्रवारी, रविवारी, मंगळवारी आणि गुरुवारी धावणार आहे.

गाडी क्रमांक 00111 पुणे- दौंड किसान रेल्वे क्‍स्प्रेस ही आठवड्यातील प्रत्येक सोमवारी, मंगळवारी आणि गुरुवारी धावत होती. ती आता आठवड्यातील प्रत्येक सोमवारी, मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी धावणार आहे. गाडी क्रमांक 00112 दौंड- पुणे किसान रेल्वे क्‍स्प्रेस ही आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी आणि रविवारी धावत होती. सदरील गाडी 9 ऑगस्टपासून आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी, रविवारी, मंगळवारी आणि गुरुवारी धावणार आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT