Chikhalthan Canva
सोलापूर

50 क्रेट पेरूला मिळाले अडीच हजार तर वाहन भाडे तीन हजार रुपये !

लॉकडाउनमुळे विक्रीअभावी शेतातच सडू लागला पेरू

गंगाधर पोळ

चिखलठाण (सोलापूर) : लॉकडाउनमुळे (Lockdown) शेतीमालाला भाव मिळत नाही. केडगाव (Kedgaon) (ता. करमाळा) (Taluka Karmala) येथील शेतकऱ्याचा 25 टन पेरू कोणीच विकत घेत नाही. तो शेतातच सडून जाऊ लागल्याने जनावरांना घालण्यास सुरवात केली आहे. पण जनावरेही खात नसल्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे. बाजारात विक्रीस पाठवून दिले असता वाहन भाडेच विक्री दरापेक्षा जास्त होत असल्याने शेतकऱ्यावर संक्रांत कोसळली आहे. (Due to the lockdown, Guava began to decay in the fields due to lack of sales)

केडगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर माळी यांनी आपल्या शेतात पारंपरिक पीक पद्धतीत बदल करावा म्हणून तीन वर्षांपूर्वी दोन एकर क्षेत्रावर पेरूची लागवड केली. गेल्या वर्षीपासून पेरूचे उत्पादन घेण्यास सुरवात केली. गेल्या वर्षी लॉकडाउन काळातच पेरू विक्रीस आले होते. पहिले वर्ष असल्याने पीकही जेमतेम होते. ते त्यांनी मिळेल त्या दराने कसेबसे विकले.

यावर्षी जोमदार पीक आले असून, दोन एकरात पंचवीस ते तीस टन पेरू निघेल. परंतु, सध्या लॉकडाउनमुळे पेरूला बाजारपेठ नाही. सोलापूर बाजार समितीत पन्नास क्रेट पाठवली. त्याचे अडीच हजार रुपये आले व पिकअप भाडेच तीन हजार रुपये झाले. अखेर कंटाळून जनावरांना पेरू घालण्यास सुरवात केली. परंतु आता ते सुद्धा पेरू खात नसल्याने मोठा तोटा सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

ऊस पिकाला जादा पाणी लागते म्हणून आम्ही फळबागांकडे वळलो. पेरू पिकाचा अभ्यास करून भरघोस उत्पादन घेतले आहे. परंतु विक्री अभावी माल सडू लागलाय. या लॉकडाउन काळातही माझ्या पिकाला ग्राहक आहे. परंतु त्यांच्यापर्यंत माझा माल सुरक्षित पोचवणारी यंत्रणा आम्हा शेतकऱ्यांजवळ नसल्याने आज मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

- ज्ञानेश्वर माळी, शेतकरी, केडगाव, ता. करमाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT